चक्रीवादळामुळे हवामानात बदल, थंडी वाढणार

    दिनांक :19-Nov-2023
Total Views |
मुंबई,
गेल्या काही दिवसांपासून cyclone देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. कुठे ऊन, कुठे पाऊस, तर कुठे थंडी असे वेगवेगळे वातावरण पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे cyclone देशात काही भागांत अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून, पावसाची शक्यता नाही.
 
 
cyclone1
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा किनारपट्टी भागातील कमी दाबाचे क्षेत्र cyclone आजच्या १७३० तासांवर कमी चिन्हांकित झाले आहे. चक्रीवादळ समुद्रसपाटीपासून १.५ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्रात पारा घसरणार आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबई, पुण्यात पुढील २४ तासांत किमान तापमानात किंचित घट होईल, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. सोबतच नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर या भागातही सकाळी आणि सायंकाळी थंडीचा जोर वाढणार असून, दुपारी आकाश स्वच्छ असेल.
 
तामिळनाडू, केरळमध्ये मुसळधार
पुढील दोन दिवस तामिळनाडू आणि केरळमध्ये cyclone मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. २१ नोव्हेंबर रोजी आंध्रप्रदेश आणि २२ नोव्हेंबर रोजी तामिळनाडू किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.