आमदार निघाले लंडनला...

१२ जणांचा समावेश

    दिनांक :19-Nov-2023
Total Views |
मुंबई,
ब्रिटनमधील London सुशासन आणि सार्वजनिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे १२ आमदार सोमवारी रोजी लंडन London दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यात भाजपा, ठाकरे गट, काँग्रेस आणि समाजवादी या पक्षांच्या आमदारांचा समावेश असून, पाच दिवसांच्या दौऱ्यात हे आमदार ब्रिटनमधील वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड विद्यापीठाला भेट देणार आहेत. विधानसभा आणि विधान परिषद सभागृहाचे मिळून १२ आमदार २० ते २५ नोव्हेंबरदरम्यान लंडन दौऱ्यावर जात आहेत.
 
 
London
 
London भाजपाचे अमित साटम, मिहिर कोटेचा, जयकुमार रावल, मंगेश चव्हाण, पंकज भोयर, शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अमीन पटेल, झिशान सिद्दिकी, अमित झनक, अस्लम शेख, समाजवादी पार्टीचे रईस शेख आणि विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील आमदारांनी या दौऱ्याबाबत कोणतीही उत्सुकता दाखवलेली नाही. त्यामुळे दोन्ही गटांतील कोणताही आमदार या दौऱ्यामध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यावर जाणारे हे आमदार सुशासन आणि सार्वजनिक धोरण या विषयाचे धडे गिरवणार आहेत. याशिवाय वेल्स विद्यापीठाच्या लॅम्पीटर कॅम्पसमधील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. कार्डिफमधील सिनेट असेंब्लीला आणि वेस्ट मिन्स्टर येथील संसदेच्या सभागृहांनादेखील हे आमदार भेट देणार असून, येथील व्हाईट हॉलमधील नॅशनल लिबरल क्लबमध्ये या दौऱ्याची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि अन्य नेत्यांच्या परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाने टीकेची झोड उठवली होती. आता ठाकरे गटाचे आमदार London लंडन दौऱ्यात सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.