गाझा,
ऑक्टोबरमध्ये हमासच्या terrorist हल्लेखोरांनी इस्रायलवर हल्ला करून अनेकांना ठार केले. यावेळी terrorist हमासने एका संगीत महोत्सवातून जर्मन-इस्रायली वंशाच्या २२ वर्षीय तरुणीचे अपहरण केले, तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिचे नग्न शरीर उघड्या जीपमधून फिरवले होते. या क्रूर घटनेवर जगभरातून संताप व्यक्त केला गेला होता. अखेर इस्रायली सैन्याने हमासच्या या कृत्याचा बदला घेतला आहे.
या घटनेतील मृत तरुणी शनीची आई रिकार्डा ल्यूक यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत खुलासा केला आहे की, इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) त्यांच्या मुलीची हत्या करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याला terrorist ठार केले आहे. गेल्या महिन्यात इस्रायलमधील एका संगीत महोत्सवावर हमासच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात २६० लोक मारले गेले होते. यावेळी जर्मन-इस्रायली तरुणी शनी लूकचे अपहरण केले गेले, तिचा पाय तोडला आणि तिच्यावर अत्याचार केले. केवळ एवढे करून ते नराधम थांबले नाहीत तर, त्यांनी संपूर्ण गाझामध्ये जखमी आणि नग्न अवस्थेत तिची परेडही काढली. यात सहभागी एका दहशतवाद्याला ठार केल्याचा दावा आयडीएफनेही केला आहे.
गाझाच्या शाळेतील रॉकेट लॉन्चरचा व्हिडीओ व्हायरल
terrorist इस्रायली सुरक्षा दलांनी शनिवारी सकाळी एक नवीन व्हिडीओ जारी केला आहे. यात रॉकेट लाँचर्स आणि मोर्टार शेल्स शाळांमध्ये म्हणजेच गाझामधील लहान मुलांसाठी बांधलेल्या बालवाडीत ठेवलेले दिसतात. इस्रायली लष्कराचा असा विश्वास आहे की, गाझा पट्टीमध्ये स्थित शाळा, रुग्णालये आणि नागरिकांमध्ये हमासचे दहशतवादी लपले आहेत. इस्रायली सैन्याने जारी केलेल्या एका व्हिडीओनुसार, आयडीएफ सैनिकांना उत्तर गाझामधील बालवाडी आणि प्राथमिक शाळेत आरपीजी, मोर्टार शेल आणि इतर शस्त्रे सापडली.