साप्ताहिक राशिभविष्य
मेष (Aries) : आर्थिक स्थिती मजबूत
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेली ग्रहस्थिती पाहता या सप्ताहात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरणारे निर्णय लवकरात लवकर घेणे जरूरी आहे. महत्त्वाच्या कामांची योग्य आखणी करणे व ते शीघ्रतेने मार्गी लावणे फायद्याचे ठरेल. एखादा मोठा व्यवहार होण्याचीही शक्यता आहे. कुटुंब व नातेवाईकांमध्ये सामंजस्य राखणे आवश्यक ठरेल. कोणीही दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. तडजोडीची भूमिका फायद्याची ठरेल. मालमत्तेच्या संदर्भातील काही प्रस्ताव समोर येऊ शकतात. त्यांचा व्यावहारिक दृष्टिकोणातून विचार करावा.
शुभ दिनांक - 21, 22, 23, 24.
वृषभ (Taurus) : सावध पावले उचलावीया आठवड्यात वरकरणी सारे काही चांगले व शुभकारक दिसत असले, तरी भलत्यावेळी अडचणीत आणणारे प्रसंग उद्भवू शकतात, असे या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेली ग्रहस्थिती पाहता म्हणावे लागेल. त्यामुळे या काळात अतिशय सावध व सतर्कपणे आपले वागणे असावयास हवे. नोकरी-व्यवसाय असो की अन्य काही, समोरची व्यक्ती विश्वासातली नसेल तर त्याच्यासमोर आपल्या योजना उघड करू नका. कुटुंबात व नातेवाईकांशी जुळवून घ्यावे लागेल. वादविवाद, संघर्षाचे प्रसंग टाळावेत.
शुभ दिनांक - 19, 20, 24, 25.
मिथुन (Gemini) : जेवढ्यास तेवढेच योग्य
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती पाहता आपल्या कलागुणांना उपयुक्त असा हा सप्ताह म्हणता येणार आहे. मात्र, याचवेळी कुठल्या तरी बाबीचा बाऊ करीत कार्यालयातील तसेच व्यवसायादी कार्यक्षेत्रातील आपला विरोधी वर्ग काही गैरसमज, अफवा पसरविण्याचा प्रयत्न करू शकतो, असेही वाटते. आपणदेखील एखाद्या मोहाला बळी पडून नसते झेंगट स्वतःमागे लावून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. आपली माणसे दुखावली जाणार नाहीत, याची काळजी घ्या. काहींना प्रवास घडावा.
शुभ दिनांक - 19, 20, 21, 22.
कर्क (Cancer) : मनाचे संतुलन राखा
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती पाहता या सप्ताहात उत्साहाने कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना सार्या बाजूंवर बारकाईने लक्ष ठेवावयास हवे. काही गोष्टी मनासारख्या न घडल्याने त्याचा त्रास होईल. काहींच्या बाबतीत आरोग्यासंबंधीचे त्रास उद्भवू शकतात. अशात मनाचे संतुलन ढळू देऊ नका. आठवडाअखेरीस काही चांगल्या घटना सुखावून जातील. आर्थिक स्थितीत फारसा बदल होणार नाही. मागील काही काळासारखीच स्थिती कायम राहील. आर्थिक अडचण जाणवणार नाही. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवावयास हवे. काही हौस, छंद, खरेदी यावर होणार्या खर्चाचा मोह सांभाळता आला पाहिजे.
शुभ दिनांक - 22, 23, 24, 25.
सिंह (Leo) : नोकरी-व्यवसायात मंदी
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती प्रामुख्याने आरोग्याच्या बाबतीत फारशी सुखावह नाही. काही मोठा आर्थिक फटकादेखील बसू शकतो. सप्तमातील शनीच्या प्रभावाने नोकरी-व्यवसायात मंदीचे सावट आढळेल. कुटुंबात काही आजारपणे निर्माण होऊ शकतात. मतभेद-वादविवाद यामुळे कुटुंबात तणाव राहण्याची शक्यता आहे. तो प्रयत्नपूर्वक दूर करावयास हवा. आर्थिक आघाडीवर असमाधानाचे चिन्ह राहू शकते. काही मोठे खर्च अचानक पुढ्यात उभे ठाकू शकतात. भागीदारीच्या व्यवहारात असाल तर सतर्क राहा. कुटुंबात सामंजस्य राखा.
शुभ दिनांक - 21, 22, 24, 25.
कन्या (Virgo) : प्रलंबित कामांना गती
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती आपणास कार्यकुशलतेने आपल्या योजना मार्गी लावण्यास सुचवीत आहे. आपली व्यग्रता वाढेल; मात्र त्यातून अंतिमतः फायदाच होईल. ही स्थिती आपणास कोणत्याही परिस्थितीत नाउमेद होऊ देणार नाही, हे मात्र नक्की. काही महत्त्वाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करता येऊ शकतील. नोकरी-व्यवसायातील कामानिमित्त दौरे, व्यावसायिक प्रवास करावे लागतील. त्यातून यशस्वी सौदे होऊ शकतील. कुटुंबात काही धार्मिक किंवा मंगलकार्याचे आयोजन होऊ शकते.
शुभ दिनांक - 19, 22, 23, 24.
तूळ (Libra) : संधी दवडू नका
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती पाहता साहित्य, कला, संगीत, विज्ञान, संगणक वगैरे क्षेत्रातील मंडळींची अपेक्षित दिशेने घोडदौड सुरू राहणार आहे. काही लोकांना धाडसी पावले उचलण्याची प्रेरणा देऊ हा सप्ताह शकतो. नोकरी-व्यवसायात आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. व्यावहारिक लाभाचा विचार करून तिचा स्वीकार करणे फायद्याचेच ठरेल. आर्थिक ताळेबंद सांभाळावा लागणार आहे. नवीन परिचय लाभकारक ठरतील.
शुभ दिनांक - 19, 20, 21, 22.
वृश्चिक (Scorpio) : अर्थभान ठेवणे आवश्यक
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले काही ग्रहयोग आपल्या कामात काही आकस्मिक परिवर्तन करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. काहीसा खर्चिक असा हा आठवडा असू शकतो. आपल्याकडे येणार्या मोठेपणामुळे हुरळून जाऊन आपण खर्च करीत सुटणार असे दिसते. त्यामुळे अर्थभान ठेवणे आवश्यक आहे. काही मंडळी प्रवास, तीर्थाटनाच्या योजना आखू शकतात. कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित घटनाक्रम घडू शकतील. कौटुंबिक जीवनात समाधान राहील. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. परीक्षा, स्पर्धा परीक्षा, प्रशिक्षण यात चांगली कामगिरी करता येईल. काहींना त्यातून अपेक्षित यश गाठता यावा.
शुभ दिनांक - 19, 20, 21, 22.
धनु (Sagittarius) : नव्या दिशा गवसणार
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती आपली एकूणच वाटचाल सुस्थितीत सुरू असल्याची द्योतक आहे. विद्वान, मोठ्या व प्रतिष्ठित माणसांमध्ये असलेली आपली ऊठबस आपली योग्यता व क्षमता दर्शविणारी आहे. यातूनच या वाटचालीत काही नव्या दिशा गवसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सार्यात मात्र कोणाला जामीन राहण्याचा धोका पत्करू नका. कौटुंबिक गणित चांगले जमलेले राहील. काहींचा आध्यात्मिक कार्याकडे कल वाढण्याची शक्यता आहे. त्यातून मानसिक समाधान लाभेल. नवी उमेद मिळू शकेल.
शुभ दिनांक - 21, 22, 23, 24.
मकर (Capricorn) : अपेक्षित यश लाभणार
या आठवड्यात आपणास अतिशय अनुकूल असे ग्रहमान लाभले आहे. या सार्या ग्रहस्थितीची पुरेपूर फले आपणास लाभणार आहेत. नोकरी-व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करून काही अपेक्षित परिणाम साधता येऊ शकतील. काहींना घर, जमीन, वाहनादी मोठी खरेदी किंवा मासमत्तेसंबंधी काही महत्त्वाचे व्यवहार करता येतील. आपला योगकारक ग्रह शुक्र रसिकता वाढविणारा आहे. कला, नाट्य क्षेत्रात उत्तम संधी मिळू शकतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. काही धार्मिक उपक्रम सुरू करण्यास प्रेरक असा हा सप्ताह ठरू शकेल.
शुभ दिनांक - 19, 20, 24, 25.
कुंभ (Aquarius) : प्रगतीच्या मार्गाने वाटचाल
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती आपणास अतिशय अनुकूल ठरावी अशीच आहे. ही सारी स्थिती हा आठवडा प्रगतिशील असण्याचे द्योतक ठरू शकते. मनोबल वाढेल. नोकरीतील आपली स्थिती अधिक मजबूत होऊ शकेल, तर व्यवसायातील मंडळींना आर्थिक स्थिती सुधारता येईल तसेच शिक्षण, संशोधन, क्रीडा, कला आणि न्याय क्षेत्रात कार्यरत असणार्यांना प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करता येऊ शकेल. अनुभवी सल्ला, सहकार्यांची उत्तम मदत, आपली जिद्द यातून दीर्घकालीन यशाचा पल्ला गाठण्यासाठीचा प्रवास सुरू होऊ शकेल.
शुभ दिनांक - 20, 21, 22, 23.
मीन (Pisces) : नोकरी-व्यवसायात तडजोड
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती आपणास कार्यक्षेत्रात व्यावसायिक यश प्रदान करण्यास कटिबद्ध दिसत आहे. मात्र काही प्रतिकूल ग्रहमान प्रकृतीची काळजी, मानसिक तणाव, काही गंभीर स्वरूपाच्या चुका यांची छाया या आठवड्यावर राहू शकेल. काही मोठे खर्च अचानक समोर उभे होऊ शकतील. त्यामुळे आपला आर्थिक ताळेबंद सहीसलामत ठेवण्याची काळजी घ्यावी लागेल. काही आप्तेष्ट, नातेवाईकांच्या संदर्भात काही मोठ्या खर्चाची जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. काही मंडळींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढू शकतो. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक - 19, 21, 23, 25.
मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746