झाडीपट्टीच्या नाटकांचा थैमान गाजणार

    दिनांक :19-Nov-2023
Total Views |
- रंगभूमीवर नाटकांचा शुभारंभ
- रसिकांना मेजवानी, कलावंतांना सुगीचे दिवस

गोंदिया, 
‘विदर्भाची खाण, महाराष्ट्राचा मान, Zadipatti Natak झाडीपट्टीची शान, नाटक झाली कलाकारांची आन’ या ओळीप्रमाणे खरोखरच आपली झाडीपट्टी ही नाटकांच्या माध्यमातून अवघ्या देशात नावारूपास आली आहे. झाडीपट्टी ही नाटकांच्या माध्यमातून अवघ्या देशात नावारूपास आली आहे. झाडीपट्टी नसून ही चित्रपट निर्माण करणारे ठिकाण झाले आहे. वडसा, देसाईगंज नावाचा तालुका झाडीपट्टी नाट्यसृष्टी संजीवनी देणारा गाव ठरला. याच झाडीपट्टीने अनेक कलावंतांना आसरा देत मोठे नाव लौकिक केले आहे. यामुळे सिनेजगातील कलाकारही इकडे येऊन आपली कला प्रदर्शित करीत आहे. दिवाळी संपताच आता झाडीपट्टीच्या नाटकांचा थैमान रंगभूमीवर भाऊबीजेच्या दिवसापासून गाजणार आहे.
 
 
Zadipatti Natak
 
विदर्भाला नैसर्गिक वारसाबरोबरच कला व सांस्कृतिक वारसासुद्धा लाभला आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या प्रदेशाला Zadipatti Natak झाडीपट्टी असे म्हटले जाते. जंगलाचे अर्थात झाडीचे प्रमाण जास्त असलेली पट्टी म्हणजे भूप्रदेश म्हणजे झाडीपट्टी असे सरळ साधे समीकरण आहे. येथील लोकांची उपजीविका जंगलांवर आणि शेतीवर अवलंबून आहे. नागपूरपासून 200 किमी दूर असलेला हा प्रदेश. या प्रदेशाची अजून एक खासियत म्हणजे इथे मोठ्या प्रमाणावर विकसित झालेली झाडीपट्टी, रंगभूमी. अगदी संगीत रंगभूमीपासून ते हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या नाटकांना आजही मराठी प्रेक्षक आवर्जून हजेरी लावतो. रात्री अंदाजे 11 वाजतानंतर ही नाटकं सुरू हातात. ती अगदी पहाटेपर्यंत चालू असतात. विनोदी, सामाजिक, राजकीय असे अनेक विषय या नाटकांमधून मांडले जातात. पूर्वीच्या काळी नट, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, वादक अशी अनेक कलाकार मंडळी एकत्र येऊन नाटकांचे सादरीकरण करतात. बदलत्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीमध्ये या नाटकांना आता तिकिटे लावली जातात. रंगभूमीला सन्मान प्राप्तझाडीपट्टी रंगभूमीसाठी नक्कीच ही सन्मानाची गोष्ट आहे. नाटकाच्या सादरीकरणासाठी एक मोठा लाकडी रंगमंच उभारला जातो. त्याच्या समोरची जमीन खणून मोठा खड्डा केला जातो आणि त्यात खुर्च्या ठेवल्या जातात. जेणेकरून पाठीमागे जमिनीवर बसलेल्या लोकांमध्ये खुर्चीवर बसलेले प्रेक्षक येऊ नयेत, यासाठी ही सोय असते. नेपथ्य, प्रकाश योजना, ध्वनी योजना अगदी उत्तम केलेली असते.