गोंदिया,
मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधनासाठी ग्रामीण भागात आयोजित होणार्या मंडईचे मोठे महत्व आहे. डई निमित्त नाटक, दंडार, तमाशा, शाहिरी आणि इतर सामाजिक प्रबोधन आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील अनेक रूढी, प्रथा व परंपरा यावर प्रबोधन केले जाते. चांगल्या विचारांचा अंगीकार करावा वाईट रूढी व विचारांचा त्याग करण्याचा संदेश या कार्यक्रमांच्या माध्यमातून केला जातो. या लोककलेचा जोपासण्याचे काम ग्रामीण भागात केले जाते, असे प्रतिपादन माजी आमदार Rajendra Jain श्री राजेंद्र जैन यांनी केले.
Rajendra Jain तालुक्यातील भानपूर येथे 18 नोव्हेंबर रोजी दिवाळी पर्वानिमित्त आयोजित दुय्यम शायरीचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अखिलेश सेठ, केतन तुरकर, नीरज उपवंशी, घनश्याम मस्करे, रवी पटले, सुनील चामट, विंध्यकला पटले, सरिता कटरे, प्रीती सेलोटी, चेतना पटले, शकुंतला पटले, कांता बिजेवार, रत्नमाला लिल्हारे, धर्मराज कटरे, योगेश पतेह, दुलीचंद चौरीवार, भक्तराज खरोले, रंजीत टेंभरे, रामेश्वर चौरागडे, मुनेश्वर कावडे, योगेश कनसरे, रौनक ठाकूर, अमदास डहाके, प्रेमलाल चौरीवार, राजूभाऊ डहाके, विजेंद्र पटले, मदनलाल बागडे, शोभेलाल डहाके सहीत मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते.