अपघातात एचआरजी कंपनीच्या ट्रक चालकाचा मृत्यू

*ट्रक चालकांनी केले कामबंद

    दिनांक :20-Nov-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
घुग्घुस,
Truck drivers strike : घुग्घुस येथील जुन्या रेल्वे सायडींगवर कोळसा खाली करून परतत असताना हरिराम गोधरा (एचआरजी) ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकचालकाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. हरिसिंग यादव (22 रा. ध्वरीसागर, युपी) असे मृतक ट्रकचालकाचे नाव आहे. ही घटना सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर संतप्त ट्रकचालकांनी एचआरजी कंपनीच्या कॅम्पजवळ आपल्या ट्रका उभ्या ठेवून कामबंद आंदोलन केले.
 
Truck drivers strike
 
एचआरजी कंपनीचा ट्रक (आरजे 23 टीआर 4409) चा चालक हरिसिंग यादव हा मुंगोली कोळसा खाणीतून सोमवारी पहाटे 4 वाजता ट्रकमध्ये कोळसा भरून निघाला. Truck drivers strike त्यानंतर घुग्घुस येथील जुन्या रेल्वे सायडींगवर कोळसा खाली करून परत जात असताना वणी तालुक्यातील पुरड गावाजवळील गतिरोधकावर एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रकचे समोरचे कॅबीन चेंदामेंदा झाले. यात कॅबीनमध्ये दबून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.
 
 
घटनेची माहिती कळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. अथक प्रयत्न करून ट्रॅकचे कॅबीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून चालकाचा फसलेला मृतदेह 2 ते 3 तासानंतर बाहेर काढला. Truck drivers strike मृतदेह विच्छेदनासाठी वणी येथे पाठविला. पुढील तपास शिरपूरचे ठाणेदार संजय राठोड करीत आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ट्रक चालकांनी आर्थिक मोबदला देण्याची मागणी करीत घुग्घुस येथील एचआरजी कंपनीच्या कॅम्प जवळ आपल्या ट्रका उभ्या ठेवून कामबंद ठेवले.