अजित पवार गटाने सादर केली बोगस प्रमाणपत्रे

शरद पवार गटाचा दावा

    दिनांक :20-Nov-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
अजित पवार गटाकडून bogus certificates केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे, तर पदाधिकाऱ्यांचीही बोगस प्रमाणपत्र जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार bogus certificates गटाने निवडणूक आयोगासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीत केला. शरद पवार गटाकडून सातत्याने तेच तेच मुद्दे मांडण्यात येत असून, वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप अजित पवार गटाने केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून आजचा युक्तिवाद संपला. पुढची सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
 
 
Ajit Pawar
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, पक्षावर दावा कुणाचा, या मुद्यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. bogus certificates या सुनावणीसाठी शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी, तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मणिंदरसिंग युक्तिवाद करीत आहेत. राकाँचे राष्ट्रीय सरचिटणीस कुवर प्रतापसिंह हे शरद पवार गटाकडे आहेत, तसे प्रतिज्ञापत्रक त्यांनी सादर केले. असे असताना अजित पवार गटाकडून कुवर प्रतापसिंह यांची खोटी सही करून त्यांचे बोगस प्रतिज्ञापत्र जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
सिंघवींची कानउघाडणी
bogus certificates केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांची कानउघडणी केली. ज्या मुद्यांवर गेल्या सुनावणीत आपण युक्तिवाद केला, त्याच प्रतिज्ञापत्राच्या मुद्यांचा आपण पुन्हा उल्लेख करू नका, अशी नाराजी आयोगाने व्यक्त केली.
अजित पवार गटाच्या वकिलांचा युक्तिवाद
bogus certificates शरद पवार गटाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद अजित पवार गटाकडून खोडून काढण्यात आला. शरद पवार गटाकडून सातत्याने खोटी माहिती दिली जात आहे आणि तेच ते मुद्दे मांडले जात असल्याचे अजित पवार गटाने म्हटले आहे. या माध्यमातून शरद पवार गटाकडून वेळकाढूपणा केला जात आहे, त्यामुळे हे प्रकरण निकाली काढावी अशी मागणीही अजित पवार गटाने केली.