ढाका,
देशातील काहीBangladesh नेत्यांच्या धमकीवरून अमेरिकी राजदूत पीटर हास यांनी देश सोडल्याची माहिती बांगलादेशचे Bangladesh विदेश राज्यमंत्री शहरयार आलम यांनी दिली.
Bangladesh पुढील वर्षांत देशात सार्वत्रिक निवडणूक होणार असून, राजदूत हास यांनी कथितपणे निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप सुरू केला होता. या प्रकाराने नाराज झालेल्या काही नेत्यांनी हास यांना धमकी दिल्याचे सांगण्यात येते. सरकारने मात्र धमकीचा आरोप नाकारला. विदेशी अधिकारी वा पाहुण्यांना संरक्षण देण्यास बांगलादेश सक्षम असल्याचेही मंत्री शहरयार आलम यांनी सांगितले.