पूजा देशमुख, राहत यांच्यावर आरोपपत्र

    दिनांक :20-Nov-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांंच्याविरोधातील Charge sheet खंडणी प्रकरणात क्लीन चिट दिल्याचा अंतर्गत अहवाल फुटल्याच्या प्रकरणात मुलगी पूजा आणि सून राहत यांच्याविरोधात सीबीआयने Charge sheet आरोपपत्र दाखल केले आहे.
 
 
Charge sheet
 
सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात Charge sheet पूजा या सह-कटकर्त्या असल्याचा आरोप आहे. त्यांनी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक गुप्ता यांना लाच देण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागा यांच्यासोबत कट रचला, त्यांना निर्देश दिला आणि मदत उपलब्ध करून दिली, असे या आरोपपत्रात म्हटले आहे.
 
२९ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशमुख यांच्या विरुद्धचा तपास बंद करण्यासाठी हा अहवाल प्रसारमाध्यमांना लीक करण्यात आला. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्याचा आदेश अनिल देशमुख यांनी दिला होता, या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या Charge sheet आरोपाची चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला होता.