अटलांटा,
माजी राष्ट्र्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी First Lady प्रथम महिला रोझलिन कार्टर यांचे रविवारी दक्षिणेकडील जॉर्जिया राज्यात रविवारी निधन झाले. त्या First Lady ९६ वर्षांच्या होत्या. अटलांटा कार्टर सेंटरने त्यांच्या मृत्यूची घोषणा केली.
कार्टर दाम्पत्याने अमेरिकेच्या राजकारणात अनेक विक्रम नोंदवले आहेत. सर्वांत जास्त काळ विवाहित अध्यक्षीय जोडपे आणि ९९ वर्षीय जिमी कार्टर हे अमेरिकेचे सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत. कार्टर सेंटरच्या मते, रोझलिन कार्टरला चार मुले आहेत. व्हाईट हाऊसनंतर First Lady रोझलिन कार्टर त्यांच्या मानवतावादी कामासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पतीने सार्वजनिक प्रतिमा राखून जगभरातील मानवी हक्क, लोकशाही आणि आरोग्याविषयी जागृती केली.
कार्टर सेंटरने एका निवेदनात म्हटले आहे की, जिमी कार्टर First Lady पत्नीच्या निधनामुळे खूप दुःखी आहेत. ते म्हणाले की, मी जे काही साध्य केले, त्यात रोझलिन ही माझी समान भागीदार होती. जगातील कोणी माझ्यावर प्रेम केले आणि पाठिंबा दिला तर, ती रोझलिन होती. जिमी कार्टरच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत First Lady रोझलिनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रोझलिन कार्टर व्हाईट हाऊसमधील धोरणात्मक निर्णयांमध्ये गुंतल्या होत्या. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकी आणि महत्त्वाच्या ब्रीफिंगचा महत्त्वपूर्ण भाग होत्या. १९४५ मध्ये कॉलेजमध्ये असताना त्यांची जिमी कार्टरशी भेट झाली आणि दोघांनी १९४६ मध्ये लग्न केले.