गहलोत सरकारची महिलांविरुद्ध अभद्र मोहीम

20 Nov 2023 20:29:13
जयपूर,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी women राजस्थानातील प्रचारसभांच्या शेवटच्या टप्प्यात गहलोत सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे. या सरकारने आपल्या राज्यातील समस्त women महिलांविरुद्ध अभद्र मोहीम सुरू केली आहे, असा थेट आरोप पंतप्रधान मोदी सोमवारी केला.
 
 
against women
 
राजस्थान विधानसभा निवडणुकीतील मतदान येत्या शनिवारी होत असून, गुरुवारी सायंकाळी प्रचार थांबणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या हाती केवळ चार दिवस शिल्लक आहेत. अशातच पंतप्रधान मोदी यांची विजय संकल्प सभा सोमवारी पार पडली. यावेळी राजस्थानातील महिलासंबंधी संवेदनशील मुद्यांना अधोरेखित केले. केंद्र सरकारने देशातील महिलांना women आरक्षण लागू करणारा नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केल्यापासून गहलोत सरकारने महिलांविरुद्ध अभद्र अशी मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या सहकारी पक्षांनी माता-भगिनींसाठी आपत्तिजनक बयाणबाजी केली असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर आपल्या विधानसभेत महिलांबाबत अपमानजनक शब्दांचा वापर केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
 
समस्त महिलांचा women अपमान करणाऱ्यांबाबत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने ब्र काढला नाही. या पक्षाचा खरा चेहरा राजस्थानी जनतेने ओळखला आहे. महिलांच्या विरोधात असलेला काँग्रेस पक्ष कधीही महिलांचे कल्याण करणार नाही, त्यांचे संंरक्षण सुद्धा करणार नाही. कारण काँग्रेसने राजस्थानातील समस्त महिलांना गुन्हेगारीत पहिला क्रमांक दिला असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
विकासात मागे ढकललेभारताच्या २१ व्या शतकातील उंचीवरील विकासात राजस्थानचा वाटा मोठा असेल. दुर्दैवाने मागील पाच वर्षांत काँग्रेस सरकारने विकासाच्याबाबतीत राजस्थानला मागे ढकलले. काँग्रेस सरकारसाठी भ्रष्टाचारापेक्षा काहीही मोठे नाही. या पक्षाने राजस्थानला मागील पाच वर्षांत दंगलीत झोकून दिले. अशा women विकृत मानसिकतेच्या काँग्रेसला कायमचा धडा शिकविणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Powered By Sangraha 9.0