Gondia thieves : शहरात दोन वाहनाच्या बॅटर्या चोरी करणार्या दोन आरोपींना 18 नोव्हेंबर रोजी शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या बॅटर्या जप्त करण्यात आल्या. शहरातील पोस्टमन चौक येथील रंजीत पुराम यांच्या मालकीच्या ट्रकची व गणेश मोहबे यांच्या ऑटोरिक्शाची बॅटरी अज्ञात इसमांनी चोरी केली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. दरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे याप्रकरणी राज उर्फ मारी सुशिल जोसफ (20) व फरहान ईशाक कुरैशी (19) रा. गौतमनगर यांना अटक केली. त्यांनी गुन्हा कबूल केली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या जप्त करण्यात आल्या.