कोलकाता,
अतिरिक्त सामान नेण्यास मनाई केल्याने नेताजी airport सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने रविवारी गोंधळ घातला. airport अनिर्बान रे असे अधिकाऱ्याचे नाव आहे.
माहितीनुसार, अनिर्बान रे सध्या पश्चिम बंगाल पोलिस विभागात अतिरिक्त महासंचालक आहेत. रविवारी त्यांना कोलकाता airport येथून दिल्लीकडे जायचे होते. त्यांच्यासोबत अतिरिक्त सामान असल्याने विमानतळ कर्मचाऱ्यांनी त्यांना वेगळ्या शुल्काची मागणी केली. परंतु, रे यांनी नकार देत गोंधळ घातला. परिणामी त्यांना प्रवासाला परवानगी न देता पोलिसांत तक्रार नोंदविली. यानंतर ३२३, ३४१, ५०५ आणि ५०६ अन्वये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.