हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ

देशांतर्गत प्रवास करणारे 14 लाख 80 हजार, सहामाहीच्या तुलनेत 41 टक्क्यांहून अधिक वाढ

    दिनांक :20-Nov-2023
Total Views |
नागपूर,
air passengers डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करणार्‍या हवाई प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्या 2022 मध्ये 10,61,134 वरून 2023 मध्ये 14,80, 261 वर गेली आहे. याशिवाय 2022 मध्ये परदेशी प्रवाशांची संख्यादेखील 19 हजार होती. तर 2023 मध्ये हीच आकडेवारी 45 हजारावर गेली आहे. नागपूर विमानतळावरून प्रवास करणार्‍या विमान प्रवाशांची संख्या 2022 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा 41 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.
 
 
air passengers
कोरोनाच्या काळात दरमहा 30 ते 40 हजारांपर्यंत आलेली प्रवाशांची संख्या आता अडीच लाखांपर्यंत पोहोचली आहे. 2023 च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून) कालावधीत 15 लाख 25 हजार 528 प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला. air passengers नागपूर विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत सतत वाढ असल्याने विमानतळ प्राधिकरणाला चांगल्या सुविधांकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.
परदेशी प्रवाशांच्या संख्येतही वाढ
नागपूर विमानतळावरुन देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करणार्‍या हवाई प्रवाशांमध्ये सतत वाढ होत आहे. 2022 मध्ये परदेशी प्रवाशांची संख्या 19, 250 होती. तर 2023 मध्ये हीच आकडेवारी 45, 267 वर गेली. देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्यादेखील 2022 मध्ये 10,61,134 वरून 2023 मध्ये 14,80, 261 वर गेली. हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ सुधारित आर्थिक परिस्थितीचे दिशादर्शक आहे.