नवी दिल्ली,
पाणबुडीतून submarine प्रक्षेपण शक्य असलेल्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओने घेतली आहे. ही submarine चाचणी अतिशय गोपनीय पद्धतीने घेण्यात आली. या क्षेपणास्त्राचे दोन प्रकार तयार केले जात आहेत.
पाणबुडीतून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५०० किमी आहे. फेब्रुवारीत झालेल्या चाचणीत याने ४०२ किमीचा पल्ला गाठला होता. याची लांबी ५.६ मीटरची, तर व्यास ५०५ मिमीचा आहे. स्फोटकांसह या क्षेपणास्त्राचे वजन ९७५ किलो आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय दिशादर्शक यंत्रणा आणि जीपीएसच्या मदतीने लक्ष्यापर्यंत पोहोचते. यात आरएफ सीकर लावण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राचे जमिनीवर हल्ला करणारे आणि युद्धनौकाविरोधी असे दोन प्रकार आहेत.
ताशी ८६४ किमी वेग
submarineया क्षेपणास्त्रांचे वैशिष्ट्य म्हणजे लॉन्चरमधून बाहेर पडल्यानंतर त्याचे पंख उघडतात. हे क्षेपणास्त्र निर्भयच्या मंचावर तयार करण्यात आले असल्यास, याचा वेग ताशी ८६४ ते १००० किमी असू शकतो. क्षेपणास्त्राची २०० ते ३०० किलो स्फोटके वाहण्याची क्षमता आहे.
रडारला गुंगारा देण्याची क्षमता
हे क्षेपणास्त्र समुद्र आणि जमिनीवरून थोड्या उंचीवरून उड्डाण करीत रडारला गुंगारा देऊ शकते. अशा स्थितीत याचा वेध घेणे अत्यंत कठीण होते.
अशी आली माहिती समोर
दुबई येथे झालेल्या एअर शोमध्ये डीआरडीओने एक पोस्टर लावले होते. त्यात या क्षेपणास्त्राच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख केला होता. यात दोन प्रकारची वॉरहेड लावणे शक्य आहे. यातील पहिला म्हणजे प्रेसिशन-कम-ब्लास्ट. हे बंकर कींवा स्ट्रॅटेजिक टार्गेट उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे. दुसरा म्हणजे एअरबस्र्ट जे कमकुवत थर असलेल्या गोष्टी उडवते.
या पाणबुड्यांवर होणार तैनात
या क्षेपणास्त्राला कलवारी क्लासच्या सिंधुघोष आणि प्रोजेक्ट-७५ मधील पाणबुड्यांमध्ये submarine तैनात केले जाणार आहे. केंद्र सरकार तीनही दलांसाठी मोठ्या प्रमाणात निर्भय क्रूझ क्षेपणास्त्र तैनात करणार आहे.