वॉशिंग्टन,
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन Ukraine कोणतीही घोषणा न करता सोमवारी युक्रेनच्या कीवमध्ये दाखल झाले. इस्रायल-हमास या नवीन युद्धाला तोंड फुटले असतानाUkraine जागतिक संसाधनांवर ताण निर्माण झाला असतानाही युक्रेनला पैसा आणि शस्त्रांचा पुरवठा कायम राहावा, यासाठी ऑस्टिन युक्रेनध्ये दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलंड येथून रेल्वेने ऑस्टिन कीव येथे दाखल झाले. ते युक्रेनच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असून, Ukraine युक्रेनचे युद्ध दुसऱ्या कठीण हिवाळ्यात प्रवेश करीत असून, या देशाची तातडीने लष्करी गरज पूर्ण करण्याकडे ते लक्ष देतील. ऑस्टिन यांचा हा दुसरा कीव दौरा आहे. मात्र, यावेळचा दौरा वेगळ्या परिस्थितीत आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर दोन महिन्यांनी म्हणजे एप्रिल २०२२ मध्ये युक्रेनचा पहिला दौरा केला होता.