आठ महिन्यात 3,554 महिलांनी केली 20 कोटी, 38 लाखांची गुंतवणूक

20 Nov 2023 20:23:54
गोंदिया,
Mahila Samman Yojana : महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सन 2023-24 च्या आर्थिक धोरणातंर्गत भारत टपाल योजनेची महिला सम्मान योजना राबवित आहे. यातंर्गत मागील 8 महिन्यात जिल्ह्यातील 3 हजार 554 महिलांनी 20 कोटी 38 लाख 57 हजार 719 रुपये महिलांनी पोस्ट कार्यालयात गुंतवणूक केले आहेत. महिला सम्मान योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2023 रोजी झालेली असून भारतीय डाक विभागाद्वारे याचे संचालन केले जाते. या योजनेची सुरुवात केवळ 2 वर्षासाठी करण्यात आली आहे.
 
Mahila Samman Yojana
 
या Mahila Samman Yojana योजनेत महिला केवळ 31 मार्च 2025 पर्यंत रक्कम गुंतवणूक करु शकतात. या योजनेत कमीतकमी 1 हजार रुपये तर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करता येते. या योजनेत व्याजाची आकारणी ही त्रेमासिक करण्यात येते आणि ग्राहकांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. दोन वर्षानंतर खाते परिपक्व होते. महिला सम्मान बचत खाते हे जवळच्या कोणत्याही डाक कार्यालयात संपर्क करुन सुरु करता येते. गोंदिया जिल्ह्यात 1 एप्रिल ते 15 नोव्हेंबर 2023 दरम्यान, 3 हजार 554 खाती महिलांनी योजनेतंर्गत डाक कार्यालयात खाते उघडले असून 20 कोटी 38 लाख 57 हजार 719 रुपये महिलांनी पोस्ट कार्यालयात गुंतवणूक केली आहे.
 
 
भारतीय डाक विभागाद्वारे या Mahila Samman Yojana योजनेसंदर्भात ‘नारी शक्ती’ म्हणून 20 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील महिलांनी जवळच्या पोस्ट कार्यालयात भेट देवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोंदिया उत्तर उपविभागाच्या सहायक अधीक्षकांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0