मराठा समाजाला हवे हक्काचे आरक्षण : मनोज जरांगे

    दिनांक :20-Nov-2023
Total Views |
पुणे, 
Manoj Jarange मराठा आरक्षणाच्या मागणीचा सोमवारी पुनरुच्चार करताना मनोज जरांगे Manoj Jarange यांनी मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात हक्काचे राजकारण हवे असल्याचे सांगितले.
 
 
Manoj Jarange
 
येथील खराडी परिसरात आयोजित एका सभेला मनोज जरांगे Manoj Jarange संबोधित करीत होते. ते आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी तसेच त्यांना जागरूक करण्यासाठी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सरकारद्वारे नियुक्त समितीने दिलेल्या माहितीनुसार, मराठा संबंधित दस्तावेजांमध्ये ‘कुणबी' अशी नोंद असलेली २९ लाख प्रकरणे आढळली असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
 
ही वस्तुस्थिती असेल, तर मराठा समाजाला मागील ७० वर्षांपासून वंचित का ठेवण्यात आले होते, कागदपत्रांमध्ये मराठ्यांकडे कुणबी असल्याचा पुरावा असल्यास, ज्या व्यक्तीने मराठ्यांना आरक्षण मिळू दिले नाही, त्याचे नाव जाणून घेणे आवश्यक आहे. या मुद्यावर सरकारला आणखी वेळ वाढवून दिला जाणार नाही. आम्हाला हक्काचे आरक्षण हवे आहे आणि आम्ही ते मिळवू, असे जरांगे Manoj Jarange यांनी सांगितले.