300 कोटींचे नवे युनिट मिहानमध्ये सुरु करणार

कंपणीचे अध्यक्ष कैलाश दिडवानिया यांची माहिती

    दिनांक :20-Nov-2023
Total Views |
नागपूर,
Kailash Didwania : मध्यवर्ती नागपूर शहर आता लॉजिस्टीक हब म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकल अ‍ॅक्सेसरीजचे उत्पादक कंपणी ग्रेट व्हाईट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे एक युनिट एमआयडीसी किंवा मिहान परिसरात सुरु करण्याचे ठरविले आहे. देशभरात वाहतूक करण्यासाठी नागपूर शहर सर्व द़ृष्टीने सोयींचे शहर असल्याने येत्या 2 वर्षात 300 कोटींचे नवे युनिट येथे सुरु करण्याचे नियोजित असल्याची माहिती कंपणीचे संस्थापक अध्यक्ष कैलाश दिडवानिया यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
Kailash Didwania
 
वलसाड, हरिद्वार आणि पटना येथे कंपणीचे अत्याधुनिक उत्पादन युनिट्स असून चौथे युनिट आता नागपुरात सुरु करण्याचे निश्चित केले आहे.या नव्या युनिटमध्ये स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जवळपास 1400 कोटींची उलाढाल असलेल्या कंपणीने अल्पावधीत नाव मिळविले असल्याचे दिडवानिया Kailash Didwania यांनी सांगितले. इलेक्ट्रिकल वायरिंग डिव्हाइसेस, वायर आणि केबल्सचे उत्पादन केल्या जाते. इलेक्ट्रिकल श्रेणीत द प्राइड ऑफ इंडिया बँड्स हा पुरस्कार कंपणीने मिळविला आहे. यावेळी प्रामुख्याने चिराग बोराडिया, संदीप मिश्रा, गोविंद पसारी, मेहुल मारू, ऋषी दलाल, संदीप धुंदे, राहुल घरत, गोपाल ठाकूर,मंजित सिंग उपस्थित होते.