अरुणाचल प्रदेशातील काही भागांत earthquake सोमवारी दुपारी मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे earthquake बसले. यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे.
चांगलांगमध्ये दुपारी पावणे दोनच्या सुमारास भूकंपाचे हादरेearthquake बसले. यानंतर अनेकांनी घर आणि कार्यालयांबाहेर धाव घेतली. तूर्तास कोणत्याही नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. रिश्टर स्केलवर त्याची नोंद ३.६ इतकी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये सोमवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास २.९ तीव्रतेचे हादरे जाणवले. भूकंपाचे केंद्र जमिनीत १३ किलोमीटर खोलीवर होते.