वाघाच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू

*जुनोना जंगलातील घटना

    दिनांक :20-Nov-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
Tiger attack : शहरालगत असलेल्या जुनोना जंगलात सरपण गोळा करण्याकरिता गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ल्ला करून ठार केले. ही घटना सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मनोहर वाणी (52, रा. आंबेडकर नगर, जुनोना रोड, चंद्रपूर) असे मृतकाचे नाव आहे.
 
Tiger attack
 
मनोहर वाणी हे सोमवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास घराजवळ असलेल्या Tiger attack जुनोना जंगल परिसरात सरपण आणण्यासाठी गेले होते. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. यात ते जागीच ठार झाले. बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबिय व परिसरातील नागरिकांनी जंगल परिसरात त्यांच्या शोध घेतला असता कक्ष क्रमांक 484 मध्ये त्यांच्या मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
 
 
वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतक मनोहर वाणी हे चंद्रपुरातील श्री जैन सेवा समिती संचालित विद्यानिकेतन हायस्कूल दादावाडी शाळेत बस चालक म्हणून मागील पंधरा वर्षापासून कार्यरत होते. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. Tiger attack मृतक मनोहर वाणी यांच्या कुंटुंबाला शासनाने आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी विद्यानिकेतन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा आप्तजनांकडून करण्यात येत आहे.