अहमदाबाद,
Travis Head : 120 चेंडूत 137 धावांची दणकेबाज खेळी करणारा व विश्वचषक कि‘केट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणार्या ट्रेव्हिस हेडची सर्वत्र चर्चा होत आहे. हेडची यशोगाथा खरोखरच प्रेरणादायी आणि करीअर घडवू इच्छिणार्या कुणालाही सकारात्मक संदेश देणारी आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी जीवघेण्या अपघातातून बचावलेला ट्रेव्हिस हेड फुटबॉल खेळता खेळता क्रिकेटपटू बनला. ट्रेव्हिस हेडचा जन्म 29 डिसेंबर 1993 रोजी ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे झाला. त्याच्या आईचे नाव अॅन आणि वडिलांचे नाव सायमन आहे. तर Travis Head ट्रेव्हिसच्या भावाचे नाव रायन आणि बहिणीचे नाव चेलिसा आहे.
हेडने Travis Head वयाच्या सहाव्या वर्षी हातात बॅट घेतली. प्रारंभी त्याला घराच्या मागच्या बाजूला दिवसरात्र क्रिकेट खेळण्याचे वेड लागले होते. त्यानंतर त्याचे क्रिकेटवरील प्रेम बळावत गेले. त्यानंतर लवकरच तो अल्पवयीन स्तरावर क्रिकेट खेळू लागला. तो क्रेगमोर क्रिकेट क्लब आणि ट्रिनिटी कॉलेजसाठी खेळला. वयाच्या 10 व्या वर्षी तो जिल्हास्तरीय क्रिकेट खेळण्यापूर्वी टी-ट्री गली जिल्हा क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला. 16 वर्षांचा असताना त्याने दक्षिण ऑस्ट्रेेलियासाठी 17 वर्षांखालील वयोगटात वेगवेगळ्या स्तरावर क्रिकेट खेळले. 2010 मध्ये त्याने ब्रिस्बेन येथे नॉर्दर्न टेरिटरी अंडर-19 विरुद्ध दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी 19 वर्षांखालील कि‘केटमध्ये पदार्पण केले. नंतर हेड 2012 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून खेळला. हेड फुटबॉल खेळता-खेळता कि‘केटपटू झाला. त्याला फुटबॉलचीही आवड होती. ट्रेव्हिस साऊथ गॉलर फुटबॉल क्लबकडून खेळत असे. 2013 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी तो भीषण अपघातातून बचावला. या अपघातात त्याच्या डोक्याला आठ आणि पाठीला सहा टाके पडले होते.
अवघ्या 29 वर्षीय Travis Head ट्रेव्हिस हेडने एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करण्याचाही विक्रम केला. त्याने 120 चेंडूत 137 धावा केल्या. त्यात 15 चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. विश्वचषकाआधी जून 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात हेडने भारताविरुद्ध शतक झळकावले होते. त्याने 163 धावा केल्या ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हेडला विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सामनावीराचा किताबही देण्यात आला. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये 5962 धावा केल्या आहेत. हेडने आतापर्यंत फक्त 10 आयपीएल सामने खेळले आहेत. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. त्यानंतर त्याने कोणताही आयपीएल करार न करता फक्त देशासाठी क्रिकेट खेळण्याला महत्त्व दिले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष केेंद्रित केले.