संघ शताब्दी महोत्सवानिमित्त महिला समन्वय समितीचे संमेलन उत्साहात

    दिनांक :20-Nov-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Women Coordinating Committee : ‘नारीशक्ती तू, प्रभूची भक्ती तू’ असे नवचैतन्य निर्माण करणारा आणि नारीशक्तीच्या एकात्मतेचे दर्शन घडविणारा महिला समन्वय समितीच्या नारीशक्ती समागमाचा देदीप्यमान सोहळा रविवार, 19 नोव्हेंबर रोजी येथील महिला विद्यालयात जिल्ह्यातील महिलांच्या प्रचंड उत्साह व प्रतिसादात पार पडला. कार्यक्रमाचे विशेष असे की, जात धर्म पंथ एकत्र आणणार्‍या व तेवीचंद महाराजांनी रचलेल्या बंजारा नृत्याने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटक अध्यात्म अभ्यासक तथा समाजसेवी मीनल येरावार होत्या. उद्घाटनपर भाषणात त्या म्हणाल्या, स्त्री शक्ती जर एकात्मतेने काम करायला लागली तर देशाला महासत्ता बनायला वेळ लागणार नाही.
 
Women Coordinating Committee
 
कार्यक्रमाच्या Women Coordinating Committee पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्या, विश्वमांगल्य सभेच्या अखिल भारतीय संघटक डॉ. वृषाली जोशी आपल्या संबोधनात म्हणाल्या, परमात्म्याचे स्वरूप म्हणजे स्त्री. ती आपल्या घरातच जगदंबेच्या रूपात, सीतेच्या रूपात, दुर्गेच्या आणि अहिल्येच्या रूपात वावरत असते. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्या मेघा इसरानी यांनी, विश्वात ‘नारी सर्वत्र पूज्यंते’ ही संस्कृती फक्त भारताची आहे. यावेळी महिला समन्वय समिती प्रांत संयोजक मीरा कडबे व विभाग संयोजक मंगला देशपांडे व्यासपीठावर होत्या. सहसंयोजक मधुरा वेळुकर, स्वाती सहस्रबुद्धे व अ‍ॅड. प्राजक्ता टिकले यांनी सूत्रसंचालन केले. चर्चासत्राची भूमिका डॉ. माणिक मेहरे, डॉ. कविता तातेड, अ‍ॅड. प्राची निलावार, अ‍ॅड. मंजूषा देव व प्रा. जोवी कुंटे यांनी मांडली.
 
 
या Women Coordinating Committee चर्चासत्रामध्ये शहरी ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध विषयांवर महिलांनी चर्चासत्र घडवून आणले आणि आपल्या समस्यांचे निरासन तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने केले. समारोप सत्रात यवतमाळ आकाशवाणीच्या वरिष्ठ उद्घोषक मंगला माळवी आणि नागपूरच्या निरामय बहुउद्देशीय संस्था सचिव डॉ. उर्मिला क्षीरसागर यांची उपस्थिती होती. यावेळी मंगला माळवी यांनी पूर्वीची आणि आत्ताची महिलांची स्थिती यावर प्रकाश टाकला.
 
 
डॉ. उर्मिला क्षीरसागर यावेळी म्हणाल्या, देशावर सांस्कृतिक आक‘मण झालेले आहे. त्यातून फक्त स्त्रीच मार्ग काढू शकते. कुटुंब प्रबोधनाचे आयाम असणे आणि मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. बाह्य गोष्टींकडे लक्ष देऊ नका, आतील मूल्य जपा, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला. Women Coordinating Committee संपूर्ण संमेलनात विशेष उपस्थिती भारतीय मजदूर संघ प्रांत प्रमुख शिल्पा देशपांडे, प्रांत कार्यवाह प्रा. अतुल मोघे, प्रांत सहसंघचालक चंद्रशेखर राठी, विभाग संघचालक विजय कोषटवार यांची होती. प्रास्ताविक मंगला देशपांडे यांनी केले. ऋचापठण श्रीयश कोरान्ने यांनी व आभारप्रदर्शन ऋचा गढीकर यांनी केले. कार्यक‘माची सांगता पसायदानाने झाली.