public relation-gadkari राजकीय क्षेत्रात जनसंपर्काला अतिशय महत्त्व आहे. पण केवळ संपर्क न ठेवता, कामे करून जनतेला दिलासा मिळण्यासाठी कसोशीने प्रयत्न अभावाने दिसतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मागील अडीच दशकांपासून जनसंपर्क सुरू आहे व संपूर्ण विदर्भात या उपक्रमाचे लाभार्थी आहेत. कामे झाल्यामुळे अनेक नागरिक आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही येत असतात. public relation-gadkari महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना नितीन गडकरी यांनी सुरू केलेला जनसंपर्क केवळ नागपूरमध्येच नाही तर विदर्भासह महाराष्ट्राच्याही विविध जिल्ह्यांमध्ये लोकप्रिय आहे. याच कारणामुळे प्रत्येक जनसंपर्क कार्यक्रमाला मोठी गर्दी होते. सुरुवातीच्या काळात महिन्यातून दोन जनसंपर्क कार्यक्रम व्हायचे. शेकडोंची गर्दी व्हायची, कोरोना काळानंतर महिन्यातून एकच जनसंपर्क कार्यक्रम होत आहे.
public relation-gadkari जनसंपर्क कार्यक्रमात नागरिक असंख्य मागण्यांची निवेदने देतात. कुणी संजय गांधी निराधार योजनेतील रखडलेल्या अनुदानासाठी, कुणी श्रावणबाळ योजनेसाठी, तर कुणी नोकरीसाठी निवेदन देतो. एवढेच नव्हे तर माहिती तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान क्षेत्रांमधील नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती देण्यासाठीदेखील अनेक जण येतात. गडकरी या साऱ्यांचे कौतुक तर करतातच, शिवाय त्यात कशाप्रकारे आणखी सुधारणा करता येईल, यासंदर्भात मार्गदर्शनही करतात. public relation-gadkari नव्या रस्त्यांची मागणी करणारे प्रस्ताव तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. गडकरी प्रत्येक निवेदनावर स्वत: लक्ष देतात आणि आवश्यकता वाटल्यास संबंधित विभागांना तातडीने सूचनादेखील करतात. क्रीडा, संस्कृती, सामाजिक, साहित्य या क्षेत्रांमधील लोकांचीही जनसंपर्क कार्यक्रमाला गर्दी असते. कुणी आपले नवीन पुस्तक भेट देण्यासाठी, कुणी पुस्तकाला शुभेच्छा हवी म्हणून गडकरी यांची भेट घेतो. या उपक्रमात प्रत्येक निवेदनाची दखल घेण्यात येते हे वैशिष्ट्य आहे. public relation-gadkari याच उपक्रमातून दिव्यांग उपकरणे देणे, बधिरांना कर्णयंत्रे देणे, आविष्कारी उपक्रमांचा प्रसार करण्याची सोय करून देण्यासारखी महत्त्वाची कामे केली जातात.
सध्या महिन्यातील एका रविवारी जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार होतो. कोरोना काळात प्रत्यक्ष जनसंपर्क होऊ शकला नाही, पण नागपूरसह संपूर्ण विदर्भात लोकांनी कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी गडकरी यांच्याकडे धाव घेतली. public relation-gadkari या कठीण काळातदेखील गडकरी कित्येकांच्या संपर्कात होते. ऑक्सिजन उपलब्ध करून देणे, धान्याची किट वाटप, मास्क वाटप, पीपीई किट वाटप आदी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. कोरोना काळात तर गडकरी फोनवरून, यूट्यूब चॅनलवरून आणि इतर समाज माध्यमांवरून नागरिकांच्या संपर्कात होते. त्यामुळे या काळात प्रत्यक्ष संपर्क नसला तरीही संपर्क मात्र कायम होता.