नविन संशोधनात मानवी जीवनावर परिणाम !

smartphone-addiction मानसिक आजाराकडे वाटचाल

    दिनांक :20-Nov-2023
Total Views |
वेध
- नितीन शिरसाट
smartphone-addiction लहान मुले ही देवाघरची फुले असे म्हटले जाते. शारीरिक व मानसिक अपरिपक्वतेमुळे या फुलांची अधिक काळजी व संगोपन करावे लागते. त्याचप्रमाणे त्यांना कायद्यान्वये संरक्षणही द्यावे लागते. त्यांना फुलविण्याकरिता चांगले आरोग्य, सुरक्षितता, सुरक्षित पाणी,पोषक अन्न, शिक्षण, सुरक्षितता प्रदान करण्याची आवश्यकता असते. smartphone-addiction या सुविधा समाजातील सर्व बालकांना मिळत नाहीत. आजही आपण स्त्रीभृणहत्या ,बालकामगार बालविवाह इत्यादी समस्या समाजामध्ये घडतांना बघतो. smartphone-addiction ह्या समस्यांवर मत करण्यासाठी जगातील प्रत्येक बालकाला सर्वांगिण विकासाचा हक्क असून त्याला सुखी व समृद्ध जीवन उपलब्ध व्हावे या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाने २० नोव्हेंबर १९५९ रोजी बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा प्रस्तुत केला तेव्हापासून हा दिवस जागतिक बालहक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
 
 

smartphone-addiction 
 
(संग्रहित छायाचित्र)
 
आजकाल भ्रमणध्वनी हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. शालेय अभ्यासापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत लोकं सतत स्मार्टफोनचा वापर करत असतात. अशा परिस्थितीत लहान मुलांमध्ये देखील स्मार्ट फोनच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. smartphone-addiction अनेक अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, जे लहान मुलं वारंवार सोशल मीडियावर असतात त्यांना नैराश्याचा त्रास होण्याची शक्यता तिप्पट असते. अशा परिस्थितीत स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांमध्ये नैराश्याची समस्या का वाढत आहे. याकडे पालकांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. यासंदर्भात नवी मुंबईमधील अपोलो हॉस्पिटल्सचे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. रितुपर्णा घोष यांनी लहान मुलांमध्ये स्मार्ट फोनच्या वापरामध्ये वाढ का झाली आहे. यासह यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये कशी जातात याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. smartphone-addiction स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे लोकांना अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होताना दिसून येत आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आजकाल मुलांमध्ये नैराश्याशी संबंधित समस्या निदर्शनास येत आहे.
 
 
अनेक अभ्यासांमध्ये स्मार्टफोनचा वाढता वापर वाढते प्रमाण यांच्यातील संबंध आढळून आले आहे. अतिवापरामुळे झोप पूर्ण न होणे, शारीरिक हालचाली कमी होणे याशिवाय समोरासमोर बोलायला संकोच वाटणे. या समस्या निदर्शनास येतात. स्मार्टफोनच्या स्क्रीनमधून निघणारी ब्ल्यू लाईट, मुलांच्या झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकतात. ज्यामुळे शांत झोप घेणे कठीण होऊन जाते. अपुऱ्या झोपेमुळे मुलांमध्ये नैराश्य आणि चिडचिडेपणा दिसून येते. smartphone-addiction मुलांचा आत्मविश्वास खूप कमी होतो. ज्यामुळे ते वास्तविक जगामध्ये कमी वेळ घालवू लागतात. एकटे राहायला सुरुवात करतात माणसं बोलायला आल्यानंतर त्यांच्यासोबत बोलणे टाळतात. अशा परिस्थितीत ते हळूहळू मानसिक आजाराकडे वाटचाल करतात. सुरुवातीची लक्षणे ओळखून त्यावर उपाय केल्याने त्यांना वेळीच रोखण्यात मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त मुलांशी सतत संवाद साधत राहा. त्यांना मैदानी खेळ किंवा त्यांच्या आवडीप्रमाणे प्रोत्साहित करा. ज्यामुळे स्मार्टफोनचं लागलेलं व्यसन सुटेल व नैराश्य देखील छळणार नाही. smartphone-addiction शाळा महाविद्यालय बंद असल्यानं मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले.
 
 
बाहेरचे खेळ बंद झाल्याने तासनतास भम्रणध्वनीवर कार्टून्स, गेम्स, सोशल मीडिया अशा मनोरंजनाच्या नवीन साधनांची मुलांना सवय लागली. स्क्रीनटाईम वाढल्याने मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला आहे. दीर्घायुष्य मिळवण्याचा एक सोपा आणि सुंदर मार्ग शास्त्रज्ञांनी शोधला आहे. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या अलिकडील संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकांमध्ये अनेक जैविक बदल होतात ज्यामुळे त्यांचे वय वाढते. शाकाहारी भोजनातून चिरतरूण दिसण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. smartphone-addiction या अभ्यासाचा निष्कर्ष साइंटिफीक अ‍ॅडव्हान्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. उष्ण उन्हाळ्याला सामोरे जाण्यासाठी निसर्गाने नेहमीच उपाय दिलेला असतो. शहरांमध्ये उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी आणि झाडांचा एकत्रित वापर करणे आवश्यक आहे. तीव्र उष्णतेसाठी शहरी हवामान अनुकूल करण्याच्या प्रयत्नांना निसर्ग-आधारित उपाय वापरून बळकट केले जाऊ शकते निसर्गाच्या सानिध्यात राहून मैदानी खेळ याशिवाय विविध स्पर्धामध्ये मुलांचा सहभाग वाढवून त्यांना भ्रमणध्वनीच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रोत्साहन देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
९८८१७१७८२८