गोंदिया,
Savita Puram मुलींवर होणारे अत्याचार व गैरप्रकारांना आळा घालण्याचे दृष्टीने स्थापन सल्लागार समिती सदस्यपदी गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सविता संजय पुराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आदिवासी विकास विभाग नाशिकचे आयुक्त यांनी निर्देशित केल्यानुसार आदिवासी विकास कार्यालयाचे अधिनस्त शासकिय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व मुलींचे वसतीगृहांमध्ये मुलींवर होणारे अत्याचार व गैरप्रकारांना आळा घालण्याचे दृष्टीने शैक्षणिक 2023-24 मध्ये शाळा, वसतीगृहांमध्ये भेटी देण्याकरीता 9 सदस्यीय विभागीय सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. Savita Puram समितीचे अध्यक्ष आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, सचिवपदी नागपूरच्या आदिवासी एकात्मीक विभागाच्या सहायक प्रशासकीय अधिकारी शोभा चव्हाण तर सदस्यपदी सविता पुराम, दामोधर कुमरे, भारती मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.