अ‍ॅग्रोव्हिजन कृषि प्रदर्शनात परिसंवाद व कार्यशाळा

मदर डेअरीचा मेगा प्लांटचा कोनशिला समारंभ
यंदा शेतकर्‍यांसाठी विशेष कार्यक्रम
संत्रा, ऊस उत्पादनावर मार्गदर्शन कार्यक्रम महिला बचतगटाचा मेळावा

    दिनांक :21-Nov-2023
Total Views |
नागपूर,
Agrovision Agricultural Exhibition : शेतकर्‍यांंना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्यांची माहिती व्हावी त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतूने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन येत्या 24 नोव्हेंबरपासून पीडीकेव्ही, दाभा मैदानावर सुरू होत आहे. यात प्रामुख्याने शेतकर्‍यांसाठी कार्यशाळा, परिषदा व राष्ट्रीय कृषी प्रदर्शन असे अ‍ॅग्रोव्हिजनचे स्वरूप राहणार आहे.
 
Agrovision Agricultural Exhibition
 
500 कोटींचा मदर डेअरी प्रकल्प
मुख्यत: यावर्षी शेतकर्‍यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 24 नोव्हेंबर रोजी विदर्भात डेअरीचा विकास या विषयावर दुपारी 2 वाजता विशेष कार्यक्रम होणार आहे. याच वेळी मदर डेअरीच्या बुटीबोरी येथील 500 कोटी रुपयांच्या मेगा प्लांटचा कोनशिला अनावरण समारंभ ही होणार आहे. Agrovision Agricultural Exhibition भविष्यात या प्लांटद्वारे रोज 10 लाख लिटर दुधाचे प्रोसेसिंग करणे शक्य होणार आहे. विदर्भातील शेतकरी दुध उत्पादनाकडे वळून शेतकर्‍यांच्या जीवनात समृद्धि व संपन्नता यावी,या उद्देशाने हा प्रकल्प साकार होणार आहे. यात 5 हजार शेतकर्‍यांचा सहभाग राहणार आहे.
 
 
ऊसाची शेती कार्यशाळा
ऊस उत्पादनासाठी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता ऊस या विषयावर कार्यशाळा घेण्यात येईल. विदर्भात ऊसाची शेती करणे आता सोपे होवू लागले आहे. ऊसाची उत्पादकता वाढविण्याकरीता काय केले पाहीजे, यावर मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत करण्यात येईल.
 
 
अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी
याशिवाय विदर्भात अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठी संधी आहे. शेतकर्‍यांना अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी व आव्हाने या बद्दल विस्तृत माहिती देण्यात येईल. एलआयटी अल्युमिनी असोसिएशनच्या सहयोगाने 25 व 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 26 नोव्हेंबर रोजी संत्रा लागवड व निर्वात संधी या विषयावर विशेष कार्यक्रम होणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी विदर्भात गोड्या पाण्यातील मत्सव्यवसाय या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 27 नोव्हेंबर रोजी महिला बचत गटाचा मोठा मेळावा Agrovision Agricultural Exhibition अ‍ॅग्रोव्हिजनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. विविध बचतगटांचे सदस्य असणार्‍या 5हजार पेक्षा जास्त महिलांचा यात सहभाग असेल. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.