दुर्गा मंदिरात काकड आरतीची ३४ वर्षापासूनची परंपरा

    दिनांक :24-Nov-2023
Total Views |
नागपूर,
Temple सध्या देवळामध्ये काकडआरती सुरु आहे.चातुर्मासात भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल हे निद्रेमध्ये असतात त्यांना जागविण्यासाठी काकडा आरतीची परंपरा आहे.  प्रताप नगर येथील दुर्गा मंदिरात गेल्या ३४ वर्षापासून भल्या पहाटे मोठ्या संख्येने परिसरातील महिला हजेरी लावून ही परंपरा अखंडपणे जपत आहे.कोजागिरी पौर्णिमेपासून काकडआरतीला सुरवात होवून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत   काकडआरतीचा उत्सव सुरु आहे.
kakad
 
 परिसरातील महिला एकत्र येवून सुरवातीला स्तोत्र, मंगलाचरण, टाळ आणि टाळ्याच्या गजरात,  समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराजांनी रचलेले काकड आरतीचे अभंग, भूपाळीचे अभंग म्हणतात नंतर काकडा घेवून देवतांना, तुळशी वृंदावन, गोपाळ कृष्णाला मध्ये ठेवून काकडा ओवाळतात.Temple आरती नंतर हरी नामाचा गजर करीत फेर धरतात. या निमित्याने परिसरात  अतिशय भक्तीभाव व मंगलमय वातावरण निर्माण होते. पसायदानाने, या सोहळ्याची सांगता होते. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा प्रामुख्याने मंदा पुरोहित, माणिक आठवले, चित्रा क्षीरसागर,देसाई, विजया आठवले, मीना शिरास, अश्विनी देशपांडे, लीला खडके, विजया कुलकर्णी, अपर्णा आठवले, ज्योती राऊत, छाया सैरावार, नीला आगाशे, विशाखा जहागीरदार, शुभदा पाठक व मोठ्या संख्येने रोज ५० महिलांच्या उपस्थितीत होत असते. मंदिर विश्वस्त समिती सातत्याने जपत आहे.
सौजन्य:श्याम काळे,संपर्क मित्र