मुंबई विमानतळाला टर्मिनल-२ उडवण्याच्या धमकीचा ई-मेल

बिटकॉईनमध्ये १ दशलक्ष डॉलर्स खंंडणीची मागणी

    दिनांक :24-Nov-2023
Total Views |
मुंबई, 
Mumbai airport मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला टर्मिनल-२ Mumbai airport उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला असून, प्रेषकाने स्फोट रोखण्यासाठी बिटकॉईनमध्ये एक दशलक्ष डॉलर्सची मागणी केली आहे.
 
 
mumbai airport
 
Mumbai airport मुंबईतील या विमानतळाला गुरुवारी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यानंतर सहार पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. हे विमानतळ मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडद्वारे चालवले जाते. गुरुवारी सकाळी ११.०६ वाजता विमानतळाच्या फीडबॅक इनबॉक्समध्ये ई-मेल प्राप्त झाला. तो एमआयएएल कंपनीच्या फीडबॅक ई-मेलवर प्राप्त झाला. विमानतळाच्या टर्मिनल-२ मध्ये स्फोट थांबविण्यासाठी ४८ तासांच्या आत बिटकॉईनमध्ये १ दशलक्ष डॉलर्सची मागणी केली.
 
तुमच्या विमानतळासाठी Mumbai airport हा अंतिम इशारा आहे. बिटकॉईनमधील १० लाख डॉलर्स पत्त्यावर हस्तांतरित न केल्यास आम्ही ‘टर्मिनल-२' इमारत ४८ तासांच्या आत उडवून देऊ. २४ तासांनंतर आणखी एक सूचना दिली जाईल, असे ई-मेलमध्ये लिहिले आहे. ई-मेल मिळाल्यानंतर मुंबई विमानतळावरील एमआयएएलच्या गुणवत्ता आणि ग्राहक सेवा विभागाच्या एक्झिक्युटिव्हने सहार पोलिस स्टेशनला संपर्क साधला व अज्ञात प्रेषकाविरुद्ध तक्रार दाखल केली.