तभा वृत्तसेवा
महागाव,
World Remembrance Day महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळण्यासाठी मदत करून त्यांचे प्राण वाचविणार्या पोलिस कर्मचारी व युवकांचा जागतिक स्मरण दिनानिमित्त महामार्ग पोलिसांच्या वतीने नागपुर येथे सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना मदत करण्याचे बहुतेक वेळा टाळले जाते. परंतु अशाही परिस्थिती महामार्गावर घडलेल्या अपघातातील जखमी नागरिकांना आपल्या जीवाची बाजी लावित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून त्यांचा जीव वाचवून मृत्युंजय दुत ठरलेल्यांचा सत्कार करण्यात आला.
यात महामार्ग पोलिस केंद्र उमरखेड (कोसदनी)चे कर्मचारी माधव धर्मा आत्राम, विनोद राठोड व अपघात ग्रस्तांना मदत करणारे युवक विकास ठाकरे (कोसदनी), निलेश आचमवार (लोणबेहळ ता. आर्णी) यांचा जागतिक स्मरण दिनाचे औचित्य साधुन मंगळवारी महामार्ग पोलिस मुख्यालय नागपुर येथे पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन सन्मान करण्यात आला. World Remembrance Day यावेळी महामार्ग पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.