अर्जुनी मोरगाव,
Upazila Hospital तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला शासकीय आरोग्यसेवेचा सर्व सुविधायुक्त लाभ मिळावा, यासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अश्विनसिंह गौतम यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

गोंदिया जिल्ह्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यटन, क्षेत्रात विकास कामे होत असली तरी अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य सुविधेच्या तुलनेत दुर्लक्षित झालेला आहे. तालुका 50-60 किमी परिसरात वसलेला आहे. अत्याधिक दुर्गम क्षेत्रातून येथे रुग्ण उपचार घेण्यास येतात. दळणवळणाची मर्यादा असल्याने ग्रामीण रुग्णालयात येणार्या रुग्णांना संपूर्ण दिवस व वेळ वाया जातो. अनेकदा रुग्णालयात सुविधे अभावी योग्य उपचार सुद्धा मिळत नाही. किरकोळ आजारी तसेच अपघात घडल्यात रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात सुविधा अभावी योग्य उपचार मिळत नाही. Upazila Hospital त्यांना 90 किमी लांब जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित केला जातो. अंतर खूप लांब असल्याने अनेकदा रुग्ण जिल्हा रुग्णालयात पोहोचण्याआधीच दगावतात. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना योग्य उपचार, आधुनिक तपास यंत्र सुविधा, तज्ञ डॉक्टर, प्रशस्त इमारत, सुसज्ज पथोलॉजी लॅब, मुबलक कर्मचारी वर्ग, आवश्यक रक्त पेढी सुविधा मिळावी आणि उपचार घेण्यास होणारा त्रास कमी व्हावा. याकरीता अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्रदान करण्यात यावा, अशी मागणी अश्विनसिंह गौतम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.