अक्षराच्या भोजपुरी तडक्याने नागपूरकरांवर घातली मोहिनी

26 Nov 2023 23:48:25
नागपूर, 
Khasdar Cultural Festival : भोजपुरी चित्रपट सृष्टीची सम्राज्ञी, अभिनेत्री अक्षरा सिंहने रविवारी सायंकाळी आपल्या गायन व अदाकारीतून उपस्थित रसिकांवर मोहिनी घालत नागपूरकरांवर अधिराज्य निर्माण केले. अक्षराच्या दिलखेचक अदा आणि गायनाचा भोजपुरी तडका उपस्थितांनी अनुभवला. तिच्या या भोजपुरी ठसक्याने उपस्थितांना थिरकायला लावले नि मैदानात माहोल झाला.
 
Khasdar Cultural Festival
 
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या Khasdar Cultural Festival खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या तिसर्या दिवशी भोजपुरी अष्टपैलू अभिनेत्री व गायिका अक्षरा सिंहने भोजपुरी तडका लावला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, त्यांच्या पत्नी अपर्णा, निको ग्रुपचे संचालक रमेश जयस्वाल, मेट्रोचे सीएमडी श्रावण हर्डीकर, व्हीआयएचे अध्यक्ष प्रशांत मोहता, एनआयटीचे चेअरमन मनोज सूर्यवंशी, ना. ना. सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अशोक गोयल, भाजपाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, रेल्वेचे डीआरएम पांडे, नंदकुमार सारडा उपस्थित होते.
 
 
रात्री 8 वाजता ‘मै हवा हुं तेरे दिल में उतर जाऊंगी’ असे म्हणत अक्षराने मंचावर एंट्री घेतली. प्रत्येकाच्या जीवनात मातेला अढळ स्थान राहिले आहे, असे म्हणत तिने ‘सारी दुनिया का हात, मेरे सरसे हटे, मां तू अपना हटाना ना’ हे भोजपुरी गीत सर्व मातांना समर्पित केले. त्यानंतर तिने ‘नागपूर गरदा उडावत चाली’ या गाणे व नृत्याने मैदानात गरदा उडवला. नायिका म्हणून करीअरला सुरुवात केली पण गाणे म्हणता येत नव्हते. रसिकांच्या प्रेमापोटी गायला सुरुवात केली असे म्हणत अक्षराने ‘मेरे रश्के कमर तुने पहली नजर’ या गीतावर ठुमके लगावले. ‘हाल क्या है दिलों का ना पुछो सनम,’ ‘इश्क और प्यार का मजा लिजिए’ सारखी अनेक जोशपूर्ण गाणी सादर करीत रसिकांना थिरकायला भाग पाडले.
 
 
कुणाल पंडितने हम्मा हम्मा व इतर दोन गाणी सादर करीत अक्षराला साथ दिली. कार्यक‘माचे संचालन रेणुका देशकर व बाळ कुलकर्णी यांनी केले. महोत्सवासाठी Khasdar Cultural Festival खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशीष वांदिले, भोलानाथ सहारे, अ‍ॅड. नितीन तेलगोटे, मनीषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.
 
बहारदार नृत्य
मुख्य कार्यक्रमापूर्वी स्वरसंगम प्रस्तुत किशोर नृत्य निकेतनतर्फे भरतनाट्यम गुरू किशोर व किशोरी हम्पीहोळी यांच्या चमूने ‘गंगा-यमुना’ ही नृत्य नाटिका सादर केली. कलावंतांनी संपूर्ण तयारी व ताकदीने न थांबता पाऊण तास नृत्य साभिनय सादर केले. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. Khasdar Cultural Festival कांचन गडकरी व अपर्णा अमितेश कुमार यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
 
परित्राण पाठ व संविधान प्रास्ताविकेचे वाचन
राष्ट्रीय संविधान दिनानिमित्ताने संविधान प्रास्ताविकेचे वाचन अविनाश घुशे यांनी केले. नितीन गडकरींसह मैदानातील सर्वांनीच शपथ ग्रहण केली. तत्पूर्वी सकाळी पूज्य भन्तेजींकडून एकाचवेळी हजारो नागरिकांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले. या Khasdar Cultural Festival कार्यक्रमात कांचन गडकरी, सुलेखा कुंभारे व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, डॉ. मिलिंद माने, अविनाश घुशे, भाजप नागपूर शहर सरचिटणीस संदीप गवई, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष सतीश सिरसवान, सुधीर जांभुळकर, राजेश हातिबेड, शंकर मेश्राम, इंद्रजित वासनिक यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0