देशातील पहिले अत्याधुनिक शव चिकित्सालय मेयोत

igmc-nagpur-mortuary लोकार्पणाच्या प्रतीक्षेत

    दिनांक :26-Nov-2023
Total Views |
नागपूर, 
igmc-nagpur-mortuary इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्ययावत शव चिकित्सालय सज्ज झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण होऊ घातले आहे. igmc-nagpur-mortuary मेयोतील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे पहिले प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. ए. सी. मोहंती यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायवैद्यकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरू झाले. येथील विद्यार्थ्यांनी येथे शिकून पुढे विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकवले. igmc-nagpur-mortuary या संकुलातील ५६३.८०० चौ.मी. तळमजला व १३९.४०० चौ.मी. पहिला मजला लोकार्पणासाठी तयार आहे. न्यायवैद्यक शास्त्राच्या मानकानुसार ही इमारत व उपकरणे आहेत, असे या विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी सांगितले. igmc-nagpur-mortuary संपूर्ण संकूल वातानुकूलित असून सोयी-सुविधा पाहून पार्थिवालाही अभिमान वाटेल.
 
igmc-nagpur-mortuary
 
तळमजल्यावर १४० चौ.मी. अद्ययावत शवचिकित्सा कक्ष तयार आहे. यात पक्के टाईल्स लावलेले सर्वसोयीयुक्त ४ शवचिकित्सा ओटे आहेत. प्रत्येक ओट्यावर आवश्यक सर्व अत्याधुनिक उपकरणे आहेत. igmc-nagpur-mortuary भिंत व छताचे उच्च क्षमतेचे कॅमेरे मृत शरीरातील अगदी सुक्ष्म बाबी टिपू शकतात. त्याचे भिंतींवरील उच्च क्षमतेच्या स्क्रिन्सवर प्रसारण होते. प्रखर एलइडी दिवे असून सूर्यास्तानंतर गरज भासल्यास शवचिकित्सा करता येईल. बाजूला आणि वर गॅलरीत ४० विद्यार्थी वा प्रशिक्षक बसू शकतात. भिंतीजवळ ४ डॉक्टर्स एकाचवेळी संगणकावर काम करू शकतात. शव चिकित्सेचा अहवाल अल्पावधीत तयार केला जाऊ शकतो. igmc-nagpur-mortuary संपूर्ण माहिती दहा वर्षे सेव्ह राहू शकते. एका डॉक्टरने केलेले अहवाल विभाग प्रमुखांशिवाय दुसरा पाहू शकत नाही. येथील ईआरपी न्यायवैद्यक बारिकसारिक बाबींचा रेकॉर्ड ठेवण्याची यात व्यवस्था आहे.
 
 
ध्वनिक्षेपक यंत्रणेतून असून कक्ष व बाहेर अंगणात किंवा फक्त या कक्षातही सूचना दिली जाऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी २५० क्षमतेचे व्याख्यान व कार्यशाळा कक्ष उच्चश्रेणी स्क्रीन्ससह आहेत. igmc-nagpur-mortuary बाहेर पोलिसांना बसण्याची व्यवस्था आहे. पहिल्या मजल्यावर डॉक्टर्स, तंत्रज्ञ, अटेंडंट यांच्यासाठी स्वतंत्र संगणकासह स्वच्छातगृहे आहेत. दृकश्राव्य प्रणालीचीसुद्धा सोय आहे. संकुलाच्या आवारात पोलिस चौकी, शेजारी लोकांसाठी बसण्याची व्यवस्था असून तेथे पंखे व पाणी तसेच स्वच्छतागृहे आहेत. या विभागासाठी स्वतंंत्र न्यायवैद्यक संस्था करण्याचा प्रस्ताव या पूर्वीच राज्य सरकारकडे पाठवला आहे. igmc-nagpur-mortuary  न्यायाची प्रक्रिया जलद करण्यासाठी क्लिनिकल न्यायवैद्यक शास्त्र, लैंगिक गुन्ह्यांमधील पीडितांसाठी वन स्टॉप सेंटर, फॉरेन्सिक दंत चिकित्सा, रासायनिक विश्लेषण, हिस्टोपॅथॉलॉजी तपासणी सुरू करण्याची योजना आहे, अशी माहिती डॉ. मकरंद व्यवहारे यांनी दिली आहे.