नवोदय नागपूरचा
- किरण राजदेरकर
नागपूर,
ksm-nagpur-gadkari खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपूरपुरताच मर्यादित राहिला नसून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातिप्राप्त झाला आहे. नावाजलेल्या कलावंतांसह स्थानिक कलावंतांचा लक्षणीय सहभाग राहत असल्याने महोत्सवास एक आगळी किनार लाभली आहे. ksm-nagpur-gadkari नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून आणि प्रेरणेतून होत असल्याने व अनेकांचे सहकार्य लाभत असल्याने हा महोत्सव यशस्वी होत आहे. अगदी दानदात्यांपासून ते प्रशासन, कलावंत, कार्यकर्ते, नागरिक, रसिक यांचा भरभरून सहभाग असतो. ksm-nagpur-gadkari प्रत्येक कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत असते. तरीही थोडीशीदेखील गडबड होत नाही, हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

हा महोत्सव प्रचंड लोकप्रिय, यशस्वी होत आहे, तो केवळ नितीनजींचा पुढाकार, प्रोत्साहन, कल्पकता, नावीन्यतेमुळेच. ‘लोकमन संस्कार करना...' या गीतामधून संस्कारांचे सिंचन झालेल्या नितीनजींना या सांस्कृतिक महोत्सवाची कल्पना सुचली. ksm-nagpur-gadkari केवळ मनोरंजनच नको, समाजप्रबोधनही झाले पाहिजे, विचारमंथन व्हावे, संस्कारांचे सिंचनही झाले पाहिजे, त्याचवेळी सामाजिक स्वास्थ्य सुदृढ व्हावे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्थानिक कलावंतांना भव्यदिव्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूंनी होत असलेला हा खासदार सांस्कृतिक महोत्सव म्हणजे तीन पिढ्यांचा संगमच ! ksm-nagpur-gadkari
भारतीय स्वातंत्र्यास ७५ वर्षे झाल्यानिमित्ताने मागील वर्षी ‘वंदेमातरम्' हा कार्यक्रम महोत्सवात प्रथम प्रारंभ झाला आणि तेव्हापासून स्थानिक कलावंतांचा सहभाग वाढला. संस्कार भारतीच्या सहकार्याने प्रत्येक स्थानिक कलावंताशी संपर्क साधला गेला. तबला, संवादिनी आणि इतर वाद्यांसह गायन व नृत्य मिळून १ हजार कलावंतांचा हा सांघिक कार्यक्रम होता. ksm-nagpur-gadkari वीस हजार चौरस फुटांच्या भव्यदिव्य व्यासपीठावर १ हजार विविध वादकांच्या वादनाचा हा रोमांचकारी क्षण नागरिकांनी अनुभवला. याशिवाय ढोलताशा पथकाचे वादन, भजन, कीर्तन, गायन आदी कार्यक्रमांनाही प्रचंड गर्दी झाली.
नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला, मागील ८ वर्षांपासूनचा हा खासदार सांस्कृतिक महोत्सव मध्य भारतातील सर्वांत मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणून देशभर चर्चा असते. ksm-nagpur-gadkari या महोत्सवात दरवर्षी रोज देश-विदेशातील नामवंत कलावंत आपल्या कलेचे प्रस्तुतीकरण करतात. महानाट्याच्या आयोजनातही स्थानिक कलावंतांचा सहभाग असतो. उदयोन्मुख कलावंतांचे दरवर्षी दररोज अर्धा तास कार्यक्रम असतात.