नासाचे प्रमुख आज भारतात

27 Nov 2023 08:58:18
बंगळुरू, 
NASA chief अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे प्रमुख बिल नेल्सन सोमवारी भारतात येत आहेत. भारताच्या ‘चांद्रयान’ मिशनच्या यशानंतर येणारे नेल्सन येथे अनेक महत्त्वपूर्ण बैठकींमध्ये सहभागी होणार आहेत. दोन देशांमध्ये अंतराळ विषयक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांच्या भेटीचे महत्त्व वाढले आहे.
 
 
NASA chief
 
मानव अन्वेषण आणि पृथ्वी विज्ञानात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांतील उच्चाधिकारी चर्चा करणार आहेत. नासा आणि इस्रो मिळून ‘मिशन निसार’ राबविणार आहेत. NASA chief या मिशनची माहिती नेल्सन यांना दिली जाणार आहे. या मिशनशी संबंधित काही महत्त्वाची माहिती ते देऊ शकतात. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, निल्सन या दौर्‍यात निसार सॅटेलाईट मिशनची पाहणी करणार आहेत. 2024 मध्ये हे मिशन राबविले जाणार आहे. निसार हे नासा आणि इस्रोदरम्यानचे पहिले संयुक्त मिशन आहे. हे एक क्रांतिकारी पृथ्वी-अवलोकन उपकरण आहे. म्हणजे याद्वारे पृथ्वीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाईल. या माध्यमातून वातावरणातील बदलाची माहिती घेतली जाणार आहे. कृषी आणि हवामान अशा दोन्ही क्षेत्रांना याचा फायदा होणार आहे. इस्रो आणि नासादरम्यान 2014 मध्ये याविषयी करार झाला होता.
Powered By Sangraha 9.0