टाटा टेकच्या आयपीओचे बंपर लिस्टिंग

    दिनांक :30-Nov-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
टाटा टेक्नॉलॉजीसच्या Tata Tech's आयपोओमध्ये पैसे लावणारे गुंतवणूकदार गुरुवारी मालामाल झाले. आज सकाळी १० वाजता या Tata Tech's कंपनीच्या आयपीओने शेअर बाजारात दमदार पदार्पण केले. टाटा टेकचे शेअर्स एक्सचेंजेसवर १४० टक्क्यांच्या (७०० रुपयांनी वाढून) प्रीमियमवर लिस्टिंग झाले. सुरुवातीच्या व्यवहारात एनएसई आणि बीएसईत ५०० रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत शेअर्सची किंमत १२०० रुपयांवर गेली. त्यानंतर त्याने १६० टक्क्यांच्या वाढीसह १,३०२ रुपयांवर उसळी घेतली.
 
 
tata tech
 
सुमारे १९ वर्षानंतर प्रथमच बाजारात आलेला टाटा समूहातील या कंपनीचा आयपीओ ऑफर फॉर सेल इश्यू असूनही त्याला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. या शेअरने एनएसईवर १,२०० रुपये आणि बीएसईवर १,१९९ रुपयांवर व्यवहार सुरू केला. त्याची इश्यू किंमत ५०० रुपये होती. याचाच अर्थ आयपीओ गुंतवणूदारांना १४० टक्क्यांची तेजी मिळाली. टाटा टेक्नॉलॉजीजचा Tata Tech's आयपीओ हा सुमारे १९ वर्षांनंतर आलेला टाटा समूहातील पहिला आयपीओ आहे. याचे आज शेअर बाजारात लिस्टिंग झाले. टाटा टेक्नॉलॉजीजच्या ३,०३४ कोटींच्या आयपीओने एलआयसीचा विक्रम मोडला होता. टाटा समूहातील या कंपनीचा आयपीओ २१ हजार कोटींचा होता. त्यासाठी गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या आयपीओसाठी विक्रमी ७३.५८ लाख अर्ज आले. टाटा टेक आयपीओला ६९.८४ पट ओव्हरसबस्क्राईब केले गेले. त्यासाठी गुंतवणूकदारांनी ७३.५८ लाख अर्ज करून १.५७ लाख कोटी रुपये मोजले होते.
 
टाटा टेक्नॉलॉजीसह Tata Tech's गंधार ऑइल आणि फेडबँक फायनान्शिअल या तीन कंपन्या आज शेअर बाजारात प्रवेश केला. गंधार ऑईलच्या शेअर्सनी गुरुवारच्या व्यवहारात एनएसईवर ७६ टक्क्यांच्या (१२९ रुपयांनी वाढून) प्रीमियमवर पदार्पण केले. एनएसईवर हा शेअर २९८ रुपयांवर लिस्ट झाला, तर बीएसईवर त्याने २९५.४ रुपयांवर व्यवहार सुरू केला.