गुगल ड्राईव्हमधून आपोआप डिलीट होतोय् डेटा

30 Nov 2023 16:19:38
न्यू यॉर्क, 
Google Drive : डेटा बॅकअप करण्यासाठी गुगल ड्राईव्हचा वापर बरेच लोक करतात. आता गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेला डेटा गायब होत असल्याची तक्रार कित्येक यूजर्सनी केली आहे. यानंतर कंपनीने इतर यूजर्सना एक इशारा दिला. गुगलने स्पष्ट केले की, काही यूजर्ससोबत ड्राईव्हवरील डेटा गायब होण्याची घटना घडली आहे.
 
Google Drive
 
84.0.0.0 ते 84.0.4.0 यापैकी एक व्हर्जन वापरणार्‍या यूजर्सना ही समस्या जाणवत असल्याचे समोर आले आहे. एका यूजरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याचा मे महिन्यापासून आतापर्यंत Google Drive गुगल ड्राईव्हवर बॅकअप घेतलेला सर्व डेटा गायब झाला आहे. त्याने गुगल सपोर्ट टीमच्या मदतीने डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. गुगल कम्युनिटी सपोर्टवर अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी आल्या आहेत.
 
कंपनीचा इशारा
दरम्यान, Google Drive गुगल ड्राईव्ह टीमने डेस्कटॉप यूजर्सना एक इशारा दिला आहे. डेटा रिकव्हर करण्यासाठी तसेच हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. तेव्हा यूजर्सनी आपल्या बाजूने कोणतीही प्रक्रिया करू नये. चुकूनही डिस्कनेक्ट अकाऊंट या पर्यायावर क्लिक करू नये, असे गुगलने म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0