मालेगाव शहरातील पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी !

30 Nov 2023 20:54:39
वाशीम, 
MP Bhavna Gawli : मालेगाव नगर पंचायतीमधील नागरीकांना नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे खा. भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून नगरोत्थान राज्यस्तर योजने अंतर्गत ४५ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी प्रदान करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेवून सदर पाणी पुरवठा योजनेच्या कामास मुख्यमंत्री शिंदे यांनी २९ नोव्हेंबर रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
 
MP Bhavna Gawli
 
मालेगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ग्रामपंचायतीचे नगरपंचायती रुपांतर झाले आहे. मात्र, मालेगाव नगर पंचायतीमधील नागरिकांना पाणी समस्येला सातत्याने सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात शहराच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण होत असते. परिणामी नागरीकांचे हाल होतात. म्हणून नगर पंचायत प्रशासनाने पाणी टंचाई दुर करण्याच्या दृष्टीने नगरोत्थान राज्यस्तर योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली होती. मात्र, विदर्भ पाटबंधारे महामंडळाकडुन या पाणी उपलब्ध होत नव्हते. म्हणून वाशीम - यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या MP Bhavna Gawli खासदार भावना गवळी यांनी मालेगाव शहरातील पाणी टंचाई दुर करण्यासाठी पुढील तिस वर्षाकरीता तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेला पाणी आरक्षण मिळावे यासाठी विदर्भ पाटबंधारे महामंडळ व जलसपंदा विभाग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन पाणी उपलब्धतेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत.
 
 
मालेगाव नगर पंचायत प्रशासनाने पाणी टंचाई दुर करण्याच्या दृष्टीने नगरोत्थान राज्यस्तर योजने अंतर्गत ४५ कोटी रुपयाची योजना प्रस्तावित केली होती. या योजनेला राज्य शासनाने मंजुरी प्रदान करावी यासाठी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खा. भावनाताई गवळी यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात्याने भेट घेवून सदर मागणी लावून धरली. MP Bhavna Gawli यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मालेगाव नगर पंचायतच्या नगरोत्थान राज्यस्तर योजने अंतर्गत ४५ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी प्रदान करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सदर पाणी पुरवठा योजनेच्या कामास बुधवारी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0