वेध
- अभिजित लिखिते
stock market-economy मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या भांडवलाने बुधवारी प्रथमच चार ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला. दुसरीकडे निफ्टीने दोन महिन्यांच्या अंतराने २० हजारांची पातळी पार केली. हा एक योगायोग ठरला. एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था ही वाढलेली महागाई आणि मंदावलेल्या वेगाचा सामना करीत आहे. stock market-economy इतकेच नव्हे, तर जगाचे ‘ग्रोथ इंजिन' समजल्या जाणाèया चीनच्या अर्थव्यवस्थेत कोणत्याही सुधारणेचे चिन्ह दिसत नसल्याच्या पृष्ठभूमीवर देशातील भांडवली बाजारांचे हे यश ठसठशीतपणे दिसून येते. stock market-economy अलिकडेच भारतीय अर्थव्यवस्थेनेही चार ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदावत असताना भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेली झेप निश्चितच कौतुकास्पद आहे. stock market-economy भारतीय अर्थव्यवस्थेबाबत गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासामुळेच मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांच्या भांडवलाने चार ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. stock market-economy दलाल स्ट्रीटवरील आशावादाचे मूळ हे भारताला जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये मिळालेल्या अद्वितीय स्थानामुळे आहे. अनेक प्रतिष्ठित पतमानांकन संस्थांनी यंदाच्या आर्थिक वर्षासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत अंदाज वाढवला.
stock market-economy भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने वाढत आहे, असे नुकतेच सीएलएसए या ब्रोकरेज कंपनीने म्हटले आहे. सध्या चार ट्रिलियन डॉलर्सवर असलेली भारतीय अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत मोठी झेप घेत जगातील तीन आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये असेल आणि जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल. २०५२ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ४५ ट्रिलियन डॉलर्सचा पल्ला गाठेल, असा अंदाज सीएलएसएने वर्तवला आहे. मात्र, हा केवळ अंदाज आहे. stock market-economy त्यामुळे आतापासून हुरळून जाण्याचे काही कारण नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी अर्थव्यवस्थेतील अडथळे दूर केले. गुंतवणूकदार, व्यावसायिकांसाठी व्यवसाय सुलभता निर्माण होईल याची काळजी घेतली. अर्थव्यवस्थेसाठी अडथळा ठरत असलेली लालफीतशाही दूर केली. केवळ इतकेच नव्हे, तर अर्थव्यवस्थेसाठी पूरक असलेल्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला. stock market-economy कधीकाळी यूपीआय पेमेंट्सला विरोधक हसले होते. देशातील कित्येकांचे बँकेत खातेच नाही. त्यामुळे यूपीआयला कितपत यश मिळेल, असा सवाल स्वनामधन्य आणि स्वयंघोषित अर्थतज्ज्ञांनी विचारला होता.
पण, २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर जनधन खात्यांच्या माध्यमातून देशातील गरीब लोकांना बँकेत खाते उघडण्याची संधी दिली. त्याचा फायदा यूपीआयला झाला. अशा कित्येक उपाययोजनांचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदाच झाला. भारतीय अर्थव्यवस्था ही क्रयशक्तीच्या समानतेतील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे, ही नजिकच्या भविष्यात वाढतच जाणार आहे. stock market-economy वेगाने विस्तारणाऱ्या या अर्थव्यवस्थेत काही चढ-उतारही येतीलच. हे चढ-उतार देशाच्या शेअर बाजारांतही होतील हे देखील निश्चित आहे आणि त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतोच. याचे उदाहरण हा १९९४ ते २००५ दरम्यानचा काळ आहे. या कालावधीत देशातील शेअर बाजारांची पद्धतशीर पुनर्रचना झाली. या कालावधीत भारताचा जीडीपी सरासरी ६.१ टक्क्यांवर होता. शेअर बाजाराचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत असतो. stock market-economy शेअर बाजारातील चढ-उतारावर अर्थव्यवस्थेचे घटक परिणाम करीत असतात. यामध्ये क्रयशक्ती आणि व्यावसायिक गुंतवणुकीचा समावेश आहे. ज्याप्रमाणे शेअर बाजाराचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, तसाच अनेक परिस्थितींचाही शेअर बाजारावर परिणाम होत असतो. वैयक्तिक समभागांच्या किमतींच्या चढ-उतारांवरून शेअर बाजारांत अस्थिरता निर्माण होत असते.
ज्यावेळी समभाग उसळतात किंवा घसरतात, तेव्हा ही अस्थिरता व्यवसाय आणि ग्राहकांवरही परिणाम करीत असते. तेजीच्या काळात समभागांच्या किमती वाढलेल्या असतात. stock market-economy बरेचदा त्यामुळे एकंदर अर्थव्यवस्थेचा आत्मविश्वास वाढतो. त्याचप्रमाणे अशा परिस्थितीत लोक बाजाराबाबत अधिक आशावादी होतात आणि वस्तू व सेवा खरेदी करतात. त्यामुळे ही उत्पादने आणि सेवा देणारे व्यवसाय अधिक उत्पादन आणि विक्री करण्यास सुरुवात करतात. असे असले, तरी शेअर बाजाराबाबत अंदाज वर्तवणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल, हे सांगणेही अत्यंत कठीण आहे. मात्र, पाया मजबूत असल्यास अर्थव्यवस्थेला सहजासहजी धक्का लागू शकत नाही. stock market-economy जगात इतरत्र पडझड होत असताना स्थिर आणि निश्चित वेग असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेने हे स्पष्ट केले आहे. देशातील राजकीय स्थिती जितकी स्थिर आणि सरकार दृढनिश्चयी, कर्तबगार असल्यास अर्थव्यवस्था बळकट राहील. जगातील कोणताही गुंतवणूकदार सुरक्षितता आणि परतावा या दोन गोष्टी पाहून गुंतवणूक करतात आणि म्हणूनच भरारी घेत असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या शेअर बाजारांत ते गुंतवणूक करीत आहेत. stock market-economy
९०२८०५५१४१