मालवाहतुकीसाठी विदर्भात आला 'समुद्र' ! (बघा व्हिडीओ)

04 Nov 2023 19:40:19
पराग जोशी
 
नागपूर,
sindi-dryport-wardha साधारणत: पोर्ट म्हणजे समुद्र मार्गे जलवाहतुकीसाठी मालाची ने-आण, साठवणूक आदींचे ठिकाण त्याला बंदर देखील म्हटले जाते. पण विदर्भात समुद्र नाही, निसर्गाने विदर्भाला हे दान दिले नाही, पण तरीही विदर्भातील शेतकरी आणि उद्योजकांचा माल त्वरित आणि थेट विदेशात पाठविण्यासाठी काही तरी केले पाहिजे हा विचार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शांत बसू देत नव्हता. sindi-dryport-wardha लगेच कल्पना आली आणि वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या जागेवर त्यांनी ड्रायपोर्ट विकसित करण्याची संकल्पना साकारली आणि कृषी व उद्योजकांच्या मालवाहतुकीसाठी थेट समुद्रच विदर्भात आणला.
 
 
sindi-dryport-wardha
 
sindi-dryport-wardha अनेक नव्या आणि स्वप्नवत वाटणाऱ्या संकल्पना गडकरींना सुचतात आणि ते साकारतात देखील. अशीच ही अतर्क्य वाटणारी संकल्पना आकार घेत आहे. ड्रायपोर्टची संकल्पना येण्यापूर्वी नागपुरात अजनी येथे इनलॅण्ड कंटेनर डेपो(आयसीडी) होता व त्या माध्यमातून विदर्भातील तांदुळ बांगलादेशसह इतर छोट्या देशांमध्ये निर्यात होत असे, पण त्यात काहीशा मर्यादा होत्या. sindi-dryport-wardha या मर्यादांवर मात करीत आता ड्रायपोर्ट साकारत असल्याने इतर कृषी मालाची निर्यात देखील शक्य झाली आहे.
 
 
 
गडकरी विदर्भातील असले तरी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असल्याने त्यांनी केवळ नागपूरचा विचार न करताना सिंदी, सोबतच जालना, सांगली आणि नाशिक असे चार ड्रायपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेत, हे काम त्यांच्याच अखत्यारित येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिक़रण (एनएचएआय) कडे सोपविले. sindi-dryport-wardha वर्धेतील सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्टसाठी ३५० एकर जागा अधिग्रहीत करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ८२ एकर जागेवर काम करण्यात सुरू आहे. ४५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रियासुद्धा पूर्ण सुरू झाली असून यातील सर्व व्यवस्था कामास प्रारंभ करतील.
sindi-dryport-wardha केवळ कृषी मालवाहतूक हा हेतू न ठेवता, उद्योजकांच्या मालाची देखील निर्यात व्हावी याहेतून ड्रायपोर्टमध्ये १२४ एकर जागा उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आली असून त्यात मालाच्या साठवणुकीसाठी गोदामे, कोल्ड स्टोरेज, कृषी माल प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, ब्रॅण्डींग आदी सेवा देणारे उद्योग स्थापन होतील, त्यांचे छोटे पुरक उद्योग स्थापन होतील आणि नागपूरहून मुंबई किंवा इतर बंदरापर्यंत माल नेण्यासाठी उद्योजकांना येणाऱ्या खर्चात बचत होईल. sindi-dryport-wardha आगामी काळात अजनी चुनाभट्ठी येथील भारतीय खाद्य निगमची गोदामे देखील सिंदी येथे स्थलांतरीत होणार आहे.
Powered By Sangraha 9.0