इंडिगो विमानाचे तिकीट बुकिंगसाठी नागरिकांमध्ये उत्साह

06 Nov 2023 19:01:22
गोंदिया,
Gondia Birsi Airport : आता 1 डिसेंबरपासून गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. इंडिगो कंपनी बिरसी विमानतळावरून सेवा देणार आहे. पहिल्याच दिवसापासून तिरुपती-हैदराबाद येथून विमान बिरसी विमानतळावर पोहोचणार असून बिरसी येथून तेच विमान हैदराबाद आणि तिरुपतीला जाणार असल्याने गोंदियासह संपूर्ण मध्यवर्ती भागातील नागरिकांचा तिकीट बुकींगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
 
Gondia Birsi Airport
 
बिरसी विमानतळावर Gondia Birsi Airport पूर्वीचे फ्लायबिग कंपनीचा काउंटरदेखील अस्तित्वात आहे आणि फ्लायबिगच्या शेजारीच इंडिगो काउंटरदेखील आहे. इंडिगोला त्यांच्या पसंतीचे स्थान देण्यात आले असून, इंडिगो सारख्या कंपनीने देशविदेशातील हवाई प्रवाशांमध्ये हवाई सेवेवर मोठा विश्‍वास निर्माण केला आहे, त्यामुळे इंडिगोच्या विमानसेवेचा लाभ गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून मिळत आहे. प्रवासाच्या सुखद अनुभूतीबाबत प्रवाशांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. नागरिक तिकीट बुक करत आहेत आणि समाज माध्यमावर शेअर करत आहेत आणि आपला आनंदही व्यक्त करत आहेत.
 
 
बिरसी विमानतळाचे Gondia Birsi Airport संचालक शफिक शाह यांनी सांगितले, पूर्वी असलेली बिरसी विमानतळावर दृश्यमानतेची तांत्रिक समस्या बर्‍याच अंशी दूर झाली आहे. लवकरच फ्लायबिगचे पूर्वी चालवलेले काउंटर काढले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच भविष्यात येथून अधिक कंपन्यांना त्यांची सेवा देण्यासाठी विमानतळ प्रशासन पूर्ण सहकार्य करेल. सध्या विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य पोलिसांकडे आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर येथील सुरक्षा आणखी वाढवली असल्याचेही त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0