शेतकर्‍यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा

06 Nov 2023 16:52:31
मानोरा,
accident insurance scheme तालुक्यामध्ये विविध अपघातात बळी पडणार्‍या, गंभीर जखमी होऊन अपंगत्व प्राप्त होणार्‍या शेतकरी कुटुंबातील नागरिकांनी शासनाकडून लागू करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी केले आहे.
 
 
accident insurance scheme
 
तालुयातून अकोला आर्णी हा १६१ ए क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. त्याचप्रमाणे कारंजा राज्य महामार्ग, कुपटा येथून यवतमाळ मंगरूळनाथ महामार्ग, धानोरा पोहरादेवी, दिग्रस जिल्हा मार्ग व मोठ्या संख्येत गावांना जोडणारे ग्रामीण मार्ग असून तालुयातील या राष्ट्रीय, राज्य, जिल्हा व ग्रामीण मार्गांवर होणार्‍या अपघातात दरवर्षी असंख्य शेतकरी कुटुंबातील नागरिक प्राणास मुकतात किंवा अपघाताने प्राणांतिक जखमा होऊन कायमचे दिव्यंगत्व प्राप्त करून घेतात. ७४ हजार ८९७ जण गतवर्षी दुचाकी अपघातामध्ये देशात बळी पडले असून, तालुयात सुद्धा मोठ्या प्रमाणात दुचाकी अपघातात उपरोक्त रस्त्यांवर प्राणहानी होत असते. दर तासाला देशात सरासरी १९ जण केवळ रस्ते अपघातात प्राण गमावतात, यातील किती जणांच्या कुटुंबीयांकडे विमा आहे. जखमी झालेल्या किती जणांच्या कुटुंबास पर्यायी उत्पन्न स्रोत असतील. accident insurance scheme उपचारांच्या खर्चाचे काय? यातील बहुतांश अपघाती मृत्यू हे १६ ते ६० या वयोगटातील म्हणजे उत्पादक वयातील असल्याने राज्य शासनाने शेतकरी कुटुंबे डोळ्यासमोर ठेवून गोपीनाथ मुंडे अपघात योजना लागू केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली. योजनेचा लाभ १० ते ७५ वयोगटातील शेतकरी कुटुंबातील वहीती धारक शेतकरी व वहीतीधारक खातेधार म्हणून नोंद नसलेले शेतकर्‍यांच्या कुटुंबातील कोणतेही एक सदस्य ( आई-वडील,शेतकर्‍याची पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कुणीही एक व्यक्ती) अशा एकूण दोघांसाठी योजना राबविली जात असल्याचे तालुका कृषी अधिकारी राठोड यांनी माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्याची विनंती तालुयातील शेतकर्‍यांना केली आहे.
Powered By Sangraha 9.0