जग आणि जगातील लोक !

security council-gaza ४५ तटस्थ देशांत भारत !

    दिनांक :06-Nov-2023
Total Views |
आंतरराष्ट्रीय
 
- वसंत गणेश काणे 
security council-gaza १५ सदस्यांच्या सुरक्षा समितीत (सिक्युरिटी कौन्सिल) गाझा प्रकरणी ठराव पारित होऊ न शकल्यामुळे हा प्रश्न महासभेसमोर आणला गेला. सुरक्षा समितीत चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे देश कायम सदस्य असून त्यांनाच व्हेटोचा अधिकार आहे. उरलेले १० सदस्य दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जात असतात. security council-gaza यात सध्या अल्बानिया, ब्राझिल, इक्वेडोर, गबन, घाना, जपान, माल्टा, मोझेम्बिक, स्वित्झर्लंड आणि युनायटेड अरब अमिरात हे अस्थायी सदस्य आहेत. १९३ सदस्यांच्या युनोच्या महासभेत मानवतावादी दृष्टिकोनातून युद्धबंदीसाठी जॉर्डनने मांडलेल्या ठरावावर, उपस्थित १७९ सदस्यांपैकी १२० सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. security council-gaza १४ सदस्यांनी ठरावाला विरोध केला. ४५ देश तटस्थ राहिले. अशाप्रकारे हा ठराव मंजूर झाला. ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या १२० देशांमध्ये चीन, फ्रान्स, सौदी अरब, युनायटेड अरब अमिरात, ओमान, येमेन, कतार, पाकिस्तान, सीरिया, इंडोनेशिया, श्रीलंका आणि बांगला देश यांचा समावेश आहे. security council-gaza तर, ठरावाच्या विरुद्ध मतदान करणाऱ्या १४ देशात इस्रायल, अमेरिका, क्रोएशिया, झेक रिपब्लिक, हंगेरी आणि पॅसिफिक महासागरातील ५ देश यांचा समावेश आहे.
 
 
security council-gaza
 
दहशतवादी हल्ल्याचा ठरावात उल्लेख नसल्यामुळे तटस्थ राहिलेल्या ४५ देशांत भारत, ब्रिटन, जर्मनी, कॅनडा, इटली, जपान, युक्रेन आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होता. security council-gaza ठरावाला कॅनडाने सुचविलेल्या दुरुस्तीत ७ ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात यावा आणि ओलिसांची तत्काळ सुटकाही करण्यात यावी, असे सुचविले होते. पण ही दुरुस्ती फेटाळली गेली. कारण केवळ ८७ देशांनीच तिला पाठींबा दिला होता आणि ५५ देशांनी तिला विरोध केला होता. हमास ही दहशतवादी संघटना असूनही जगातील बहुसंख्य देशांनी तिच्या हल्ल्याचा निषेध केला नाही, ही बाब धक्कादायक आहे. जग हे असे आहे. security council-gaza भारताच्या तटस्थ राहण्याबाबत भारतातील विरोधी पक्षांनी तसेच इतर काही देशांनी टीका केली आहे. भारत सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, इस्रायलवर एका दहशतवादी संघटनेने (हमास) केला आहे. कोणत्याही देशाने नाही. भारताचे धोरण दहशतवादाचा निरपवादपणे निषेध करण्याचे आहे. भारताचा पॅलेस्टाईनला पाठींबा असला, तरी भारत दहशतवादी हल्ला करणाऱ्या संघटनेची/हमासची बाजू घेणार नाही. security council-gaza ठरावाच्या बाजूने मत देणाऱ्या देशांमध्ये प्रामुख्याने फ्रान्स, श्रीलंका आणि बांगला देश हे देश आहेत तर तटस्थ देशांमध्ये प्रामुख्याने भारत, ब्रिटन, जर्मनी, कॅनडा, जपान हे देश आहेत आणि विरोधात मतदान करणाऱ्या देशांमध्ये इस्रायल आणि अमेरिका आहे.
 
 
 
अमेरिकेचे ठरावाच्या विरोधात मतदान; फ्रान्सचे ठरावाच्या बाजूने मतदान आणि ब्रिटन, जर्मनी, कॅनडा, इटली, ऑस्ट्रेलिया जपान तटस्थ; या भूमिका नोंद घ्याव्यात अशा आहे. security council-gaza यांच्या भूमिका एकसारख्या आणि ठरावाच्या विरोधात राहतील, असे अनेक राजकीय निरीक्षकांना वाटत होते, पण तसे झाले नाही. जी-८ च्या ८ सदस्यातही (अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, कॅनडा, इटली, ऑस्ट्रेलिया आणि जपान) वेगवेगळी भूमिका होती. जग कसे आहे तर जग असेही आहे. इस्रायलची निरपराध्यांना पूर्वसूचना : उत्तर गाझा पट्टीतून नागरिकांनी दक्षिण गाझापट्टीत निघून जावे अशा आशयाच्या सूचना इस्रायलने प्रसारित केल्या होत्या. आम्हाला दहशतवादी हमासला संपवायचे आहे, नि:शस्त्र व निरपराध पॅलेस्टाईनी नागरिकांना कोणतीही हानी व्हावी, अशी आमची इच्छा नाही. security council-gaza म्हणून उत्तर गाझा पट्टीतून नागरिकांनी दक्षिण गाझा पट्टीत निघून जावे, अशा आशयाच्या सूचना यापूर्वीही इस्रायलने दिल्या आहेत. निरपराधींना युद्धग्रस्त भागातून निघून जाण्यासाठी इस्रायलने पुरेसा वेळ यापूर्वीही दिला होता. जग कसे आहे? तर जग असेही आहे. आज गाझापट्टी बेचिराख झाली आहे. शाळा, मशिदी आणि दवाखान्यांमध्ये भूमिगत भुयारांची प्रवेशद्वारे उघडत असल्यामुळे या इमारती पूर्वसूचना देऊन इस्रायल नष्ट करीत आहे. security council-gaza लपून बसलेल्या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार करीत आहे.
 
 
 
याचवेळी इस्रायल लेबॅनॉनमधील हिजबुल्लाच्या, सीरियामधील इसिसच्या आणि येमेनमधील हूती दहशतवाद्यांचाही समाचार घेत आहे. तर उत्तर कोरिया, इराण, तुर्की, कतार, सीरिया आदी देशांना सर्वसामग्रीचा पुरवठा करीत स्वत: मात्र प्रत्यक्ष कारवाईपासून अलिप्त (?) राहिले आहेत. security council-gaza पॅलेस्टाईनींना गाझा पट्टीतून पुढे सिनाई वाळवंटात हाकून लावण्याचा निश्चय इस्रायलने केला आहे, असे सध्यातरी दिसते आहे. ज्यूंचे अरब साथीदार : इस्रायल हा ज्यूंचा देश असला, तरी त्यातील बेडूइन अरबांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. इस्रायल या ज्यू राष्ट्राच्या सैन्यामध्ये अरब लोकांचा समावेश आहे हे तर आश्चर्यच म्हटले पाहिजे. यांना बेडूइन असे नाव आहे. कोण आहेत, हे बेडूइन? त्याचे असे झाले की, या युद्धाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये इस्रायलमधील ज्यू लोक अश्रफ नावाच्या एका बेडूइन सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत. security council-gaza हे अरब इस्रायली सैनिकांसोबत कसे काय, याबाबत कुतूहल जागे होणे स्वाभाविकच आहे. बेडुईन हे भटके मुस्लिम-अरब लोक आहेत. हे दक्षिणेला नेगेव वाळवंटात राहणारे, कोणत्याही राष्ट्राशी संबंध नसलेले, निदान गेली १५० वर्षे तरी पशू हेच उत्पन्नाचे साधन असलेले मुस्लिम आहेत. या बेडूइन लोकांना स्थायिक होण्यासाठी ज्यू लोकांनी मोठ्या प्रमाणावर साहाय्य केले. त्यांना शस्त्रे चालविण्याचे शिक्षण दिले.
 
 
security council-gaza १९४८-४९ च्या अरब आणि इस्रायली युद्धादरम्यान बेडुईन लोकांनी इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ला मदत केली होती. इस्रायलने बेडूइन लोकांना नागरिकत्व तर दिलेच; शिवाय त्यांच्यासाठी वसाहती बांधून दिल्या. पुढे इस्रायली सैन्यात बेडूइन सैनिकांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. १९९३ मध्ये देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या १५० बेडूइन सैनिकांचे स्मारक ब्रोकन हार्ट गार्डन या नावाने इस्रायलने गॅलिलीतील एका टेकडीवर बांधले. security council-gaza ज्या सैनिकांच्या मृत्यूविषयी काही कळले नाही, त्यांची आठवण म्हणून हा ब्रोकन हार्ट गार्डन आहे. बेडूइन लोक इस्रायली लोकांची हिब्रू भाषा शिकले, त्यांची संस्कृतीही त्यांनी आपलीशी केली. आज इस्रायलमध्ये २५ हजार बेडूइन लोक दक्षिणेकडील नेगेव वाळवंटात मोठ्या प्रमाणात राहतात. २०२० मध्ये तर इस्रायलने इस्माईल खाल्दी या मूळच्या बेडूइन व्यक्तीला इरिट्रियामध्ये राजदूत म्हणून नेमले.
 
 
असे अनेक बेडूइन नागरिक इस्रायलमध्ये निरनिराळ्या पदांवर यशस्वीरीतीने काम करीत आहेत. security council-gaza सामान्यत: अशा मानववंशांच्या जुन्या संस्कृती जपण्याचा मार्ग स्वीकारला जातो. अनेकदा त्यांचा वंशविच्छेदही केला जातो. पण इस्रायलने वेगळा मार्ग स्वीकारला. त्यांनी भटक्या बेडूइनांना शिक्षण देऊन सुसंस्कृत केले. त्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था स्थापन केल्या. नोव्हेंबर २०२२ मध्ये मध्ये इस्रायली सरकारने ऑपरेशन नेगेव्ह शिल्ड सुरू केले. हा एक दूरचित्रवाणी (टीव्ही) हा कार्यक्रम बेडूइन लोकांच्या शिक्षणासाठीच सुरू करण्यात आला आहे. security council-gaza इस्रायल हा ज्यूंचा देश असला, तरी त्यातील बेडूइन-अरब वंशीयांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. ज्यू आणि बेडूइन या दोन भिन्न मानव वंशातील सहकार्य आणि परस्पर सौहार्द नजरेत भरणारे आहे. हे जग असेही आहे तर!
९४२२८०४४३०