तभा वृत्तसेवा
वर्धा,
Vasantrao Deshpande's : वर्धा शहर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कायम आघाडीवर राहत आले आहे. 21 वर्षांपूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांचे कंकण बांधून त्रिवेणी या संस्थेने सांस्कृतिक चळवळ सुरू केली. 16 वर्षांपासुन दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसु बारसेला पहाटे 5.30 वाजता दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी वसंतराव देशपांडे यांचा नातू नचिकेत देशपांडे विशेष आकर्षण ठरणार आहे.
त्रिवेणीतर्फे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन वर्धेकरांसाठी पर्वणी ठरत आली आहे. स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर गेल्या 16 वर्षांपासुन सलग दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या Vasantrao Deshpande's कार्यक्रमात फक्त मराठी, हिंदी भावगीतच होतात असे नव्हे तर वाद्यांची जुगलबंदीही झालेली आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील राहुल सक्सेना सारख्या युवा गायकांनी हजेरी लावली आहे. हा कार्यक्रम दरवर्षी एका थिमवर आयोजित करण्यात येत असुन गायनासह व्यासपीठावरील सजावटही तेवढीच आकर्षक असते. यावर्षी गौरव महाराष्ट्राचा फेम नचिकेत देसाई, झी मराठी सारेगमप फेम महेश कंटे, स्वस्तिका ठाकूर व गौरी शिंदे मैफल सजवणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक अरुण काशीकर, महेश मोकलकर यांनी केले आहे.