अफगाणिस्तानच्या इब्राहिमने घडवला इतिहास

07 Nov 2023 23:35:13
नवी दिल्ली, 
Afghanistan Ibrahim : वयाच्या 21 व्या वर्षी अफगाणिस्तानच्या इब्राहिम झादरानने मंगळवारी विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांना झोडपून काढले. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तानसाठी एका फलंदाजाने शतक झळकावले. शतक झळकावून इब्राहिमने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचे विक्र मोडीत काढले. इब्राहिमने केलेल्या नाबाद 129 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने 50 षटकांत 5 बाद 291 धावा उभारल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 292 धावांचे लक्ष्य ठेवले.

Afghanistan Ibrahim
 
आयसीसी वन-डे विश्वचषकाच्या 39 व्या सामन्यात Afghanistan Ibrahim इब्राहिम झादरान अफगाणिस्तानसाठी विश्वचषकात शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचवेळी, त्याच्या आधी कसोटी कि‘केटमध्ये हा पराक्रम रहमत शाहने केला होता, ज्याने 2019 साली बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत शतक झळकावले होते. अफगाणिस्तानकडून कसोटीत शतक झळकावणारा रहमत हा पहिला फलंदाज होता.
 
 
इब्राहिम झादरानने Afghanistan Ibrahim वयाच्या 21 व्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले व विश्वचषकात असे करणारा चौथा सर्वात युवा फलंदाज ठरला. वयाच्या 21 वर्षे व 330 दिवसांत इब्राहिमने एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावले. या बाबतीत त्याने महान कि‘केटपटू सचिन तेंडुलकर आणि माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. कोहलीने 2011 मध्ये वयाच्या 22 वर्षे 106 दिवसात बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. त्याचवेळी सचिन तेंडुलकरने वयाच्या 22 वर्षे व 300 दिवसांत एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावले.
 
वन-डे विश्वचषकात शतक झळकावणारे सर्वात तरुण खेळाडू
20 वर्षे 196 दिवस - पॉल स्टर्लिंग, 2011
21 वर्षे 76 दिवस - रिकी पॉण्टिंग, 1996
21 वर्षे 87 दिवस- अविष्का फर्नांडो, 2019
21 वर्षे 330 दिवस- इब्राहिम झादरान, 2023
22 वर्षे 106 दिवस - विराट कोहली, 2011
22 वर्षे 300 दिवस - सचिन तेंडुलकर, 1996
 
Powered By Sangraha 9.0