- नेर तालुक्यातील टाकळी येथील घटना
नेर,
तालुक्यातील Takli Salami Gram Panchayat टाकळी सलामी येथील ग्रामपंचायत कार्यालयाला शनिवार, 4 नोव्हेंबरला ग्रामपंचायत सदस्याने कुलूप लावले होते. मंगळवारी दैनंदिन कामकाज सुरू करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी कुलूप उघडण्यासाठी गेले असताना त्यांना ग्रापं सदस्याने मारहाण केल्याची घटना सकाळी 11.30 वाजता घडली. टाकळी सलामीचे सरपंच, उपसरपंच यांनी राजीनामा दिला असल्याने येथे प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. यामुळे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र काष्टे यांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावले. याबाबत ग्रामविकास अधिकारी संजय वानखडे नेर पोलिसांकडे तक्रार दिली असून गुन्हा नोंद आहे.
Takli Salami Gram Panchayat : ग्रामपंचायत कामकाज बंद असल्याने ते सुरू करण्यासाठी ग्रावि अधिकारी संजय वानखडे, प्रशासक व ग्रामपंचायत कर्मचारी सोबत घेऊन गावात गेले. ग्रामपंचायतला लावलेले कुलूप उघडण्यासाठी गेले असता ग्रापं सदस्य रवींद्र काष्टे याने वानखडे यांना अटकाव करत वाद घालून मारहाण केली. ग्रावि अधिकारी संजय वानखडे यांच्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी ग्रापं सदस्य रवींद्र किसन काष्टे (वय 51) याच्याविरुद्ध भादंवि कलम 353, 332, 341, 506 नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.