नागपूर,
diwali pahat-nagpur बालरंगभूमी परिषद, नागपूर व डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, ८ नोव्हेंबरला रोजी सकाळी ६.३० वाजता विष्णूजी की रसोई येथे प्रथमच बालक दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. diwali pahat-nagpur बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखा सातत्याने कार्यरत असते.
diwali pahat-nagpur विविध उपक्रमांद्वारे बालगोपालांना मंच उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालरंगभूमी परिषद, नागपूर प्रयत्नरत असते. बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखा यांचा असाच एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे दिवाळी पहाट. diwali pahat-nagpur यावेळी ही दिवाळी पहाट बालगोपालांच्या संगीतमय मैफिलीने साजरी करण्याची संधी बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेने सोडली नाही. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती सर्व संस्थांच्या अध्यक्षांनी केली आहे. diwali pahat-nagpur
सौजन्य : रेखा घिया दंडिगे, संपर्क मित्र