जयपूर,
Rajasthan Election : राजस्थान विधानसभा निवडणुकीतील मतदान आठवडाभरावर आले असतानाच भाजपात जोरदार ‘इन कमिंग’ सुरू झाले आहे. काँग्रेससह अन्य काही पक्षातील नेत्यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीतील 200 जागांसाठी एकाच टप्प्यात येत्या 17 नोव्हेंबरला मतदान होत आहे. विविध राजकीय पक्षांच्या टीका, आरोप-प्रत्यारोप, कुरघोडी सुरू असतानाच बुधवारी प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी, केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी महापौर विष्णू लाटा, काँग्रेसच्या सुनिता भाटी, जैसलमेर येथील काँग्रेस नेते राजेश मांडिया यांच्यासह राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि अन्य पक्षांच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.
जोशी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर विश्वास ठेवत Rajasthan Election भाजपात दाखल होणार्यांची संख्या वाढत आहे. मागील पाच वर्षांतील काँग्रेसने जनतेला कुशासन दिले आहे. गृहलक्ष्मी योजनेची गॅरंटी देणारे गहलोत सरकार महिलांचे संरक्षण करू शकले नाही. सरकार खोटे आश्वासन देत बेरोजगारांची भलावण करत असून, 2018 मध्ये रोजगार भत्ता देण्याच्या आश्वासनाचे काय झाले? शेतकर्यांना देण्यात येणार्या कर्जमाफीचे काय झाले, या प्रश्नांची उत्तरे मिळणार नसल्याने जनतेने आता काँग‘ेसची गॅरंटी संपविली आहे.
भाजपा राज्यात Rajasthan Election प्रचंड बहुमताने सत्तेत येणार असल्याने या कुशासनाचा अंत होणे निश्चित आहे. गजेंद्रसिंह शेखावत यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली. राजस्थानात गहलोत सरकार बेकार ठरले असून, राज्यात एकदा अपयशी ठरलेल्या सरकारला पुन्हा संधी मिळत नाही. काँग‘ेसचे वर्तन(चाल), चरित्र आणि चेहर्याला जनतेने चांगलेच ओळखले आहे. भ्रष्टाचार्यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचेही गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले.