आर्वीच्या गौतीर्थावर उमलले हळदीचे दुर्मिळ फूल

* शेतकर्‍यांच्या आरक्षणासाठी लढणार्‍याकडेच निसर्गाचा चमत्कार

    दिनांक :08-Nov-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्वी,
Turmeric flower : हळद हे शेतकर्‍यांसाठी शाश्वत उत्पन्नाचे पीक असुन धार्मिक विधींमध्ये अतिशय महत्त्वाची पूजन सामुग्री व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी औषध आहे. साधारणतः मे-जून महिन्यात हळदीची लागवड करण्यात येते व मार्च महिन्याच्या सुमारास हळद परिपक्वतेच्या परिस्थितीत काढणीसाठी येते. हळदीच्या झाडाला अपवादानेच फुलं आल्याचे पाहायला मिळते. परंतु, येथील प्रगतीशील शेतकरी एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांच्या गौतीर्थ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेतातील हळदीला फुलं Turmeric flower आल्याने पाहणार्‍यांची गर्दी होऊ लागली आहे.
 
Turmeric flower
 
हळदीचा Turmeric flower वापर रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटनाशकांमध्ये व पूजेमध्ये करण्यात येतो. हळद हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे फुलोर व परागीकरण या बाबींचा या पिकाशी संबंध येत नाही. हळदीला फुलोर येत नाही मात्र अनेकानेक वर्षांमध्ये एखाद्या वर्षी अतिशय अपवादात्मक परिस्थितीत हळदीच्या एखाद्याच झाडाला फुल पाहायला मिळते. आर्वी येथील एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांच्याकडे असलेल्या शेतातील हळदीच्या झाडाला फुलं लागल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
झाडाच्या बोंध्यापासून निघालेले साधारणतः 8 ते 10 इंच उंचीचे वरून पांढर्‍या रंगाचे हे फुल उमलतांनी दिसते. हिंदू पौराणिक कथांनुसार या हळदीच्या फुलाला असल्याचे सांगण्यात येते. हे Turmeric flower हळदीचे फूल उमलणे अतिशय शुभ, सकल परिसरात सकारात्मक उर्जा निर्माण करणारे व यशस्वितेचे प्रतिक मानल्या जाते. पौराणिक इतिहासातील नोंदीनुसार ज्या राज्याची सेना युद्धावर गेली असेल त्या राज्यात जर हळदीचे फुल उमलले तर त्याला युद्ध विजयाचे शुभ संकेती लक्षण म्हणून संबोधील्याच्या नोंदी आहेत.
 
 
अलीकडच्या काळात वास्तू शास्त्रज्ञ या फुलाला लाल रेशमाच्या कपड्यात गुंडाळून धन संचयनाच्या ठिकाणी ठेवल्याने धनवृद्धी होत असल्याचे सांगतात. त्याच प्रमाणे ज्या घरांमध्ये उच्च शिक्षण घेणारे व स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतात त्यांच्याकडे या फुलाचा उपयोग सरस्वती पूजनासाठी केल्यास हमखास यशप्राप्ती होत असल्याची मान्यता आहे. लक्ष्मी पूजनासाठी हे फुल मिळाल्यास अखंड वैभव लक्ष्मीची प्राप्ती होत असल्याचेही पौराणिक कथांमध्ये सांगण्यात आले आहे. Turmeric flower एकंदरीत निसर्गातील सकारात्मक उर्जेचे प्रतिक म्हणून यशप्राप्ती व धन संपदा वृद्धिंगत करणारे दुर्लभ यंत्र म्हणून धार्मिक महत्त्व असलेले हे हळदीचे फूल आहे. काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांच्या आर्वी येथील गौतीर्थ गौसंगोपण व संशोधन केंद्रात हळद लागवडीच्या क्षेत्रात अवघ्या पाच महिन्याच्या हळदीच्या रोपाला हे फूल नोव्हेंबर महिन्यात लागले आहे.